crime (फोटो सौजन्य - pinterest)
छत्तीसगडमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका आईस्क्रिम कारखान्यातील दोन कामगारांवर त्यांच्या मालकाने आणि त्याच्या सहकार्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी मालकाने कामगारांचे नखे काढली आणि त्यांना विजेचे झटके दिले. हा संतापजनक प्रकार छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात घडला आहे.
एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
नेमकं प्रकरण काय?
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आइस्क्रीम कारखान्यात काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने कामावर ठेवले होते. 14 एप्रिल रोजी गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी दोन्ही कामगारांवरती चोरीचा आरोप केला. त्यानंतर दोघांचेही कपडे काढून त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटली.
पोलिसांनी दिली माहिती..
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की राजस्थामधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आईस्क्रीम कारखान्यात काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने कामावर ठेवले होते. १४ एप्रिल रोजी गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी दोन्ही कामगारांवर चोरीचा आरोप केला. त्यांनी सांगितले की दोघांचेही कपडे काढून त्यांना विजेचे झटका दिला आणि त्यांची नखे काढण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एका अर्धनग्न व्यक्तीला विजेचे झटके दिले जात आहेत आणि मारहाण केली जात आहे. घटनेनंतर दोन्ही पीडित तेथून पळून गेले आणि भिलवाडा येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नौकरी सोडण्याची इच्छा म्हणून राग
पीडितांपैकी एकाने सांगितले की, त्यांनी त्यांच्या मालकाकडे वाहनाचा हप्ता भरण्यासाठी वीस हजार रुपये आगाऊ मागितले होते. मालकाने नकार दिला तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मालकाला याचा राग आल्याने त्यांने अत्याचार केले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनेनंतर दोन्ही पीडित तेथून पळून गेले आणि भिलवाडा येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजस्थान पोलिसांनी ‘शून्य’ एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.