हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक (File Photo : Fraud)
अकोला : बाळापूर पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रात तरुणाला नोकरी देण्याचे आमिष दाखवून 16 लाख 4 हजार 995 रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (दि. 20) बाळापूर पोलिसांनी आरोपी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हे सुद्धा वाचा : बदलापूर अत्याचार प्रकरण; सायबर सेलकडून 21 वर्षीय तरूणीला अटक
बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबड येथील एका पक्षाचे पदाधिकारी अरविंद देवलाल वानखडे, मुलगा श्रीकांत अरविंद वानखडे व मनीष मुरलीधर लंके (रा. बिर्ला गेट, अकोला) यांनी पारस औष्णिक वीज प्रकल्पात नोकरी लावून देतो म्हणून अब्दुल गुफरान अब्दुल गफ्फार (26, रा. खतीब कॉलनी, बाळापूर) याची 16 लाख 4 हजार 995 रुपयांची फसवणूक केली. आरोपींना नोकरीबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीचे उत्तर देऊन नोकरी लावून देण्यास व पैसे परत देण्यास चार वर्षांपासून टाळाटाळ केली.
अखेर अब्दुल गुफरान याने मंगळवारी (दि. 20) बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलिस करत आहेत.
हे सुद्धा वाचा: बदलापूर प्रकरण: आरोपीच्या वडीलांचा खळबळजनक दावा; अक्षयची वैद्यकीय तपासणीची मागणी
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता अकोल्यात तरूणाला नोकरीला लावतो म्हणत 16 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.