(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू
युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने रविवारी पहाटे १.३० च्या सुमारास अचानक हल्ले सुरु केले. कित्येक तास हे हल्ले सुरुच होते. यामध्ये युक्रेवर ४१ क्षेपणास्त्रे आणि १२५ ड्रोन्सचा मारा करण्यात आला. या हल्ल्यात राजधानी कीव्हलाच लक्ष्य करण्यात आले होते. याची युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुष्टी केली आहे.
या हल्ल्यांमुळे निवासी इमारती, कार्यालये, औद्यगिक प्रकल्प आणि विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. कीव्हमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगी लागल्याच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.
कीव्हसह खार्कीव, खेरसॉन आणि सुमी या शहरांनाही लक्ष्य करण्यात आले. खार्किवजवळ एका टपाल केंद्रावर झालेल्या हल्ल्यात ३ जणांचा बळी गेला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. खेरसन आणि सुमी शहरांना गाइडेड बॉम्बने लक्ष्य करण्यात आले असून या शहरांमध्येही मोठी जीवितहानी झाल्याचे सांगितले जात आहे.
#UPDATE 🇷🇺🇺🇦 Part 2 Footage has been released showing the damage a Ukrainian metro station in Kyiv experienced last night following a Russian missile strike on the Zavod Artem defense manufacturer that was located across the street from the station. Multiple missiles hit the… https://t.co/BZbOKeN9mu pic.twitter.com/YFxi1AxCDj — Heyman_101 (@SU_57R) July 19, 2026
दुसरीकडे युक्रेननेही रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने रशियातील तेलसाठी आणि उर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. यामुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. युद्धाच्या वाढत्या तणावामुळे युक्रेन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे.
Middle East Conflict : अमेरिका-इराण तणाव वाढला! भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना






