शेठला कोर्टाच्या आवारात जेवणाची परवानगी, तर गरीब आरोपीचे फेकले जेवण; पोलिसांचा हा भेदभाव का?
कल्याण कोर्टाबाहेर एका आरोपीच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला. गोंधळाचे कारण होते की, पोलिस व्हॅनमध्ये बसलेल्या आरोपीला त्याचा भाऊ जेवण देण्यास गेला. ते जेवण पोलिसांनी फेकून दिले. त्यावरुन वाद झाला. मात्र याच दिवशी एक प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी आलेले भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना कोर्ट परिसरात जेवण करण्याची परवानगी दिली. कोर्टाने जेवणाची परवानगी देणे योग्य आहे. एका गरीब आरोपाला नातेवाईक जेवण देतात. ते जेवण का फेकले दिले गेले. यातून पोलिसांचा भेदभाव उघड झाला आहे.
कल्याण कोर्टात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड हे २०१४ सालच्या एका प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी येणार होते. कल्याण कोर्टात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. माजी आमदार गायकवाड आले. त्यांनी कल्याण कोर्टात त्यांचा जबाब नोंदविली. कोर्टाने सुनावणी दरम्यान त्यांना जेवणाकरीता विचारणा केली. त्यांना रितसर कोर्टाच्या आवारात जेवणाची परवानगी दिली गेली. गायकवाड यांनी त्यांच्या परिवाराच्या उपस्थितीत जेवण केले. त्यानंतर त्याना पोलिसांना तळोजा कारागृहात नेले.
त्याचवेळी दुसऱ्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करुन कोर्टातील हजेरी झाल्यावर पुन्हा पोलिस व्हॅनमधून त्याला कारागृहात घेऊन जात होते. त्याचवेळी त्याचे नातेवाईक त्याला वडापाव आणि खाण्याच्या वस्तू देण्याकरीता व्हॅनकडे गेले. याचवेळी पोलिसांनी कैदी आरोपीला वडापाव देऊ दिला नाही. वडापाव देणाऱ्या तरुणाला पोलिसांना मारहाण केली. वडापाव आणि अन्य वस्तू पोलिसांनी फेकून दिल्या. हे पाहताच आरोपीचे नातेवाईक भडकले. यावेळा त्यानी गोंधळ घातला. या दोन प्रकरणात असे दिसत आहे की, एका प्रकरणात एका आरोपीच्या मागे सत्ताधारी पक्ष आहे. त्याला जेवणाची अनुमती दिली जाते. त्याला पोलिस बंदोबस्त देतात. तेच पोलिस एका गरीब आरोपीला वडापाव सुद्धा देऊ देत नाही. यावरुन पोलिसांचा भेदभाव उघड झाला आहे.






