खालापूर तालुक्यात गोरक्षकांनी मोठी कामगिरी केली आहे. कल्याणकडे म्हशी घेऊन जाणारे चार टेम्पो अडवले. या टेम्पोंना कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. प्रत्येक टेम्पोत वीस अश्या चार टेम्पोत अंशी म्हशी असाव्यात व त्यातील जवळपास सहा ते सात म्हशी वाहतूक करताना मृत झाल्या असून या म्हशी कत्तलिसाठी नेल्या जात असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार सांगोला येथून या म्हशी कत्तलिसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे नेल्या जात आहेत अशी गुप्त माहिती मावळ तालुक्यातील गोरक्ष व बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानुसार पुण्याच्या कात्रज बोगद्या पासून या गोरक्षकांनी या संशयित टेम्पोचा पाठलाग केला व खालापूर येथील गोरक्षकांच्या मदतीने या चार टेम्पो पैकी तीन टेम्पो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या टोल नाक्यावर पकडले. आणि एक फूड्मॉल येथे पकडला.
पहाणी केली असता या चारही टेम्पो मध्ये दाटी दाटी ने कोंबून म्हशी भरल्या होत्या. खालापूर टोल नाका हा खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने येथे पकडलेल्या तीन टेम्पो खालापूर पोलीस ठाण्यात आणले गेले तर एक टेम्पो फूड्मॉल येथे पकडल्याने ती हद्द खोपोली पोलिसांची येत असल्याने तो टेम्पो खोपोली पोलीस ठाण्यात नेण्यात आला.
याबाबत खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी माहिती दिली की चार आयशर टेम्पो व सात आरोपी ताब्यात घेतले असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 11 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील कारवाई सुरु आहे. या आधी देखील कर्जत तालुक्यातील सावेळे गावामध्ये एका मुस्लिम कुटुंबातील तरुणाकडून दिवसाढवळ्या गोहत्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार गोरक्षकांनी उघडकीस आणला होता .गायींची कत्तल करण्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी अलकाज पटेल या तरुणाला ताब्यात घेतले होते. त़्यावेळी अन्य सात पशूंची कत्तल होण्यापासून सुटका करून या गायींना आणि पाळीव जनावरांना गोशालेत दाखल केले. याचपार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र आंदोलन देखील केली होती.
याचपार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस उप अधीक्षक डी डी टेले यांनी दामत गावात तेथील मुस्लिम धर्मीय लोकांची बैठक घेतली.गोहत्या बंदीचा कायदा असल्याने खुलेआम होत असलेली कत्तल रोखणे हे सर्वंचे कर्तव्य आहे. मुस्लिम समाजाने देशाचे कायदे समजून घेतले पाहिजेत असे सूचित केले होते.त्यानंतर पोलिसांनी काही हिंदू धर्मीय नेत्यांशी चर्चा केली आणि व्हायरल व्हिडीओवरून निर्माण झालेले वादळ शमविण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी मुस्लिम धर्मीय यांनी नेरळ पोलीस स्टेशन येथे येऊन आम्ही गो-हत्या होऊन देणार नाही तसेच कोणी करत असेल तर आम्ही स्वतः कारवाई करू. तसंच करण्यासाठी आमच्याकडे असलेली घरगुती पाळीव जनावरे त्यांना देखील टॅग मारून ठेवावेत अशी सूचना केली होती.