काय नेमकं प्रकरण?
मिळालेली माहितीनुसार, बुधवारी सकाळी डॉ. मेहुल राठोड यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रियांका या नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर लगेचच डॉ. मेहुल हे आपली इनोव्हा कार घेऊन घराबाहेर पडले. सायंकाळी चार वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने आणि फोनवर कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे डॉ. प्रियांका यांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले. तेव्हा त्यांचे लोकेशन घरापासून ८ किलोमीटर दूर अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ दाखवले. तात्काळ डॉ. प्रियांका हे लोकेशननुसार तिथे पोहोचले. तेव्हा डॉ मेहून हे कारमध्ये अत्यंत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने फुलाबाई बनसोडे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…
पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना चालकाच्या बाजूच्या सीटवर भूल देण्याच्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आल्या. त्यामुळे औषधाचा ओव्हरडोस घेऊनच हा आत्महत्येचा प्रकार घडल्याचा संशय अधिक बळावला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करत आहेत.
डीवायएसपीने काय सांगितलं?
या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितले की, “डॉक्टरांनी स्वतःला भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन घेऊन आपले जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल.”घटनास्थळावरून किंवा कारमधून कोणत्याही प्रकारची चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी आता डॉक्टरांचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्यामधील डेटा तपासला जात आहे. काही ठोस पुरावे हाती लागल्यानंतरच या टोकाच्या पावलामागचे मूळ कारण स्पष्ट होईल.” असे डीवायएसपीने सांगितले.
शहरात खळबळ
या प्रकरणी लातूर एमआयटी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…
Ans: अंबाजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजजवळ त्यांच्या कारमध्ये.
Ans: भूल देणारे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे.
Ans: भूल देणाऱ्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या आणि सिरिंज.






