दरम्यान, गावांत आक्रोश कायम असून, दहश्तीचे वातावरण पसरले आहे. आ. विजय रहांगडाले यांनी गावात भेट देवून मृतक मुलांच्या आई वडिलांचे सांत्वन केले. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याचीही मागणी रेटून धरली. हियांश शिवशंकर रहांगडाले असे मृत चिमुकल्याचे नाव असून, तो आपल्या आई वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पसार झाला. चिमुकल्याला ठार केल्यानंतरबिबट्या जंगलात पळून गेला. घटनेतील मृतक चिमुकला हियांश याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर गावकऱ्यांना आढळून आला.
दुसऱ्या एका घटनेत गेल्या काही दिवसांपूर्वी याच तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे रूची पारधी नामक मुलगी तिच्या वडिलांसोबत शेतात गेली होती. दरम्यान, बिबट्याने मुलीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मुलीला गोंदिया येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यता आले होते. तिथे उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या घटनेत मृत मुलीचे वडील शेतात गेले होते आणि त्यांची मुलगी रूची त्यांच्यासोबत शेतात उभी होती. दरम्यान, बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. रूचीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील आणि जवळच्या शेतात काम करणारे शेतकरी त्यांच्याकडे धावले. त्यानंतर बिबट्या रूचीला सोडून जंगलाकडे पळाला. तेव्हापासून तिरोड्याच्या इंदोरा निमगाव आणि सुकडी डाकराम या परिसरात वन्य प्राण्यांची दहशत आहे.
जंगलव्याप्त गावात दहशत
तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम, पिंडकेपार, खडकी, डोगरगाव, खमारी, बालापवूर, आलेझरी, बेरडीपार, खुशीपार या गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. पिंडकेपार गावात प्रवेश करून बिबट्याने राजू शेंडे यांच्या गायीची शिकार केली. तर वासराला जखमी केले, राजू शेंडे हे गोठ्यात म्हशीला सोडण्यासाठी गेले असता, ही बाब उघडकीस आली होती, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी याबाबतची माहिती पिंडकेपार, बोदलकसा बिटाचे वनरक्षक पटले यांना माहिती दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मागील तीन ते चार दिवसांपासून पिडकार येथे गावात बिबट्याचे दशन होत आहे. याची माहिती वनविभागला देण्यात आली होती. परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वन विभागाने याची दखल घेवून त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Ans: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात.
Ans: हियांश शिवशंकर रहांगडाले.
Ans: बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त आणि सुरक्षा उपाय.






