Crime News Live Updates
बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात संतप्त शेतकाऱ्याने चक्क भाजपा आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान पेटवून देण्याचा प्रयत्न केलाय. अतिवृष्टीमुळे शेतीच झालेलं नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी आरोपी विशाल मुरुख सोनाळा पोलीसात गुन्हा दाखल केला असून शेतकरी आता पोलिसांच्या अटकेत आहे. तर मुरुख याच्यावर सोनाळा पोलीस स्थानकात लोकप्रतिनिधींना समाज माध्यमात धमकी देऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा दुसरा गुन्हाही दाखल झालेला आहे. मात्र या एकंदरीत प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
15 Jun 2025 04:11 PM (IST)
मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.
15 Jun 2025 03:08 PM (IST)
पुणे शहरातील रस्ता पेठेत असलेले एक हॉस्पिटल तसेच बाणेर भागातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकाचा मेल आल्याने शनिवारी रात्री प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धावपळ करत बॉम्ब शोध व नाशक पथक घटनास्थळी पाचारण करून दोन्ही हॉस्पिटलची पूर्ण तपासणी केली. पण, त्यात काहीही गैर किंवा संशयास्पद आढळून आले नाही. यानंतर पोलीस दलाने आणि हॉस्पिटल प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. चौकशीनंतर कोणीतरी हा केलेला खोडसाळपणा केला असल्याचे स्पष्ट झाले.
15 Jun 2025 02:45 PM (IST)
पुणे: शहरातील प्रसिद्ध केईएम रुग्णालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. ही माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर बॉम्ब शोध व निकामी पथक (BDDS) तसेच सायबर पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण इमारतीची कसून तपासणी करण्यात आली.
15 Jun 2025 02:44 PM (IST)
नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. आता नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि नंतर घरतील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मोहन ठाकरे असे आहे. विशेष म्हणजे यांची हत्या करणारा दुसरं तिसरं कोणी नाही तर त्याची पत्नी आहे. ही घटना सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळच्या मलगोंडा येथे उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीचा नाव प्रभा यशवंत ठाकरे असून अटक केली आहे. आरोपी पत्नीने हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने नाशिक जिल्हा हादरला आहे.
15 Jun 2025 12:55 PM (IST)
अमरावती जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. कुलरचा शॉक लागल्याने आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्य झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे ही घटना घडली. कुलरमध्ये पाणी टाकतांना हा विद्युत शॉक लागलायचे समोर. सुमती लक्ष्मण कासदेकर (वय 35) श्वेता लक्ष्मण कासदेकर (वय 4) आणि विकी लक्ष्मण कासदेकर (वय 3) असे मृतांची नावे आहेत.
15 Jun 2025 12:34 PM (IST)
सम्राटनगरातील उद्योजक राजीव जयकुमार पाटील यांच्या बंगल्यात गुरुवारी भरदिवसा झालेल्या सशस्त्र चोरीचा शुक्रवारी पोलिसांनी उलगडा केला आहे. चालकानेच मालकाच्या ४४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे समाेर आले आहे. चालकासह त्याच्या साथीदाराला अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकत दोघांकडून ५० लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रकाश दत्तात्रय चौगुले (वय ३८, रा. हंचनाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) व अमित विश्वनाथ शिंदे (वय २५, यादवनगर, डवरी वसाहत, कोल्हापूर) या दोघांना अटक केली आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांनी दिली.
15 Jun 2025 11:22 AM (IST)
भिवंडीतून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येथील एका केमिकल गोदामात अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५० कोटी रुपयांचे सामान जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग इतकी तीव्र होती की परिसरात काही काळ अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं.स्थानिक नागरिकांनी आगीची माहिती तात्काळ पोलिस आणि अग्निशमन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
15 Jun 2025 11:20 AM (IST)
पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्या गँगमधील सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांकडून एन्काऊंटर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावच्या जवळ हा एन्काऊंटर झाला आहे. शाहरुख शेख (वय 33, रा.हडपसर) असे एन्काऊंटर झालेल्या गुंडाचे नाव आहे. शाहरुख शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर रॉबरी आणि मारहाण, खुनाचा प्रयत्न असे तबल १५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दोन वेळा मोक्का कारवाई देखील करण्यात आलेली आहे.
15 Jun 2025 10:43 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहापूर येथील लोटस पार्कच्या प्रवेशद्वारासमोरील कमानी समोरील मोकळ्या जागेत जुन्या वाद उफाळून आल्याने रागाच्या भरात मित्राचा मित्रानेच कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. गणेश रमेश पाटील (वय २१ रा. आगर. ता. शिरोळ) असे मृताचे नाव असून, अभिषेक सुकुमार मस्के (वय १९, रा. आगर) याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
15 Jun 2025 10:42 AM (IST)
पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छांद घातला असून, तीन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल २७ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.