Crime News Live Updates
गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष क्लासवरून पार्किंगमध्ये आल्यानंतर गोळ्या झाडल्या. यामध्ये आयुषचा मृत्यू झाला, या घटनेनंतर पुणे शहरात पुन्हा टोळायुध्द सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे.
09 Sep 2025 04:40 PM (IST)
राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा काढलेल्या जीआर साताऱ्यात फाडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
09 Sep 2025 04:20 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच आहे. गणपती सणापूर्वी खड्डे बुजविले तरी पुन्हा तीच परिस्थिती असून यावर महामार्ग ठेकेदार कंपनी केवळ तात्पुरती मलमपट्टी करीत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील पणदूर, वेताळ बांबर्डे, हुमरमळा येथील खड्डे सिमेंटने भरल्यानंतर पुन्हा चार दिवसात होते तसे होतात. यामुळे मागील चार दिवसात या भागात दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वाहनचालकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय.
09 Sep 2025 04:00 PM (IST)
येरवडा येथील कॉमरझोन आयटी पार्कमधील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला रविवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा धोका टळला. येरवडा परिसरातील मरझोन या नावाने आयटी पार्क आहे. दरम्ऱ्यान, रविवारी रात्री अचानक फ्लॅटमध्ये धुर येत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाला माहिती दिली. लागलीच अग्निशमन दलाने याठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत आग पसरली होती. आगीने उग्ररूप धारण करण्यास सुरूवात केली होती. जवानांनी पसरत चालेल्या या आगीवर पाण्याचा माराकरून ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली. येरवडा, खराडी, नायडू, धानोरी अग्निशामक केंद्रातील जवानांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीमध्ये सर्व कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू आणि इतर साहित्य जळाले. आगीत कोणी जखमी झाले नाही. नायडू अग्निशामक केंद्रातील जवान सोन्या नायडू यांच्या पायाला दुखापत झाली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंक्षण कक्षाकडून देण्यात आली.
09 Sep 2025 03:50 PM (IST)
सध्या नेपाळमध्ये मोठी अराजकता निर्माण झाली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी मंगळवारी (०९ सप्टेंबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी देखील त्यांचा राजीनामा स्वाकारला आहे. परंतु अजूनही नेपाळमधील राजकीय संकट वाढत आहे. सध्या लष्कराच्या हातात सत्ता जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यामागचे कारण म्हणजे नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी राजीनामा देताना लष्कराने पद सोडण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. तर परिस्थितीत हाताळता येईल असा सल्ला ओली यांनी देण्यात आला.
09 Sep 2025 03:49 PM (IST)
तुम्हाला आठवतंय का अलीकडेच सोशल मीडयावर घिबली ईमेजचा ट्रेंड सुरु झाला होता. नेत्यांपासून सेलिब्रिटिंपर्यंत सर्वजण घिबली ईमेज तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत होते. AI टूल्स चॅटजीपीटी आणि ग्रोक घिबली ईमेज तयार करण्यात आघाडीवर होते. सर्वांनाच घिबलीचे वेड लागले होते. तसेच घिबली ईमेज तयार करणं देखील अत्यंत सोपं होतं. घिबली ईमेजनंतर आता पुन्हा AI चे एक नवीन फीचर ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक रिल्स देखील व्हायरल होत आहेत.
09 Sep 2025 03:45 PM (IST)
राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग खड्यांच्या समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. अलिबागपासून वडखळ रस्ता केवळ 22 किमीचा. 22 किमीचा राष्ट्रीय महामार्ग (क्र.166ओ) अत्यंत दुरवस्थेत असून लाखो खड्डे, उंचवटे, वाकडे-तिकडे वळणं यामुळे प्रवास जीवघेणा बनला आहे. या रस्त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण तसेच रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
09 Sep 2025 03:40 PM (IST)
टोळी युद्धातून अवघ्या १८ वर्षीय आयुष कोमकर याच्यावर आंदेकर टोळीकडून झालेला हल्ला अत्यंत क्रुरपद्धतीचा असल्याचे समोर आले असून, दोघांनी आयुषवर गोळ्यांचा वर्षाव केल्याचे वास्तव समोर आले आहे. त्याच्यावर ११ गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यातील ९ गोळ्या आयुषला लागल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
09 Sep 2025 03:38 PM (IST)
काल नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. नागरिकांनी मोठे आंदोलन केले. त्यानंतर सरकारने ही बंदी मागे घेतली. दरम्यान संसद भवनाबाहेर मोठी निदर्शनं सुरू होती. आता नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम दिल्यावर ते आता दुबईत शरण घेण्याची शक्यता आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे आंदोलनामुळे परिस्थिती बिघडली आहे. नेपाळच्या संसद भवनाबाहेर आंदोलकांनी मोठी निदर्शने केली आहेत. पंतप्रधान व सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. दरम्यान थोड्याच वेळापूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता आता दुबईत शरण म्हणजेच नेपाळ सोडून दुबईत आश्रय घेण्याची शक्यता आहे. तसेच सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. त्याची विमाने देखील सज्ज असून काही वेळात मंत्री आपल्या परिवारांसह नेपाळ सोडून जाण्याची शक्यता आहे.
09 Sep 2025 03:24 PM (IST)
सांगलीच्या मिरज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकू भोसकल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री अपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल धनपाल पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) आता गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
09 Sep 2025 03:20 PM (IST)
महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक पुणे जिल्हा, लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण, आयटी पार्क्स, औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था आणि कृषी क्षेत्र यांमुळे सतत विकसित होत आहे. मात्र या वेगवान विकासाचा परिणाम होऊन ग्रामीण पोलीस दलावर प्रचंड ताण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात सुमारे ३,६०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे २०० कर्मचारी राज्य महामार्ग सुरक्षा दलात कार्यरत असल्याने प्रत्यक्षात कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी होते. जिल्ह्यात सध्या ३९ पोलीस ठाण्यांद्वारे ग्रामीण भागात पोलीस कारभार चालवला जात आहे.
09 Sep 2025 03:11 PM (IST)
सांगली : सांगलीच्या मिरज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकू भोसकल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री अपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल धनपाल पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) आता गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
09 Sep 2025 03:06 PM (IST)
ऑस्ट्रेलियाच्या संघाला मागील झालेला मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2025 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील कांगारूला इंग्लंडच्या मैदानावर पराभूत केले. ऑस्ट्रेलियन संघाचे पुढील लक्ष हे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या सिरीजकडे असणार आहे. या मालिकेला सुरुवात 21 नोव्हेंबर पासून होणार आहे या दोन संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
09 Sep 2025 03:05 PM (IST)
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती आता कमी होणार आहेत. त्यात 43 इंच आणि त्याहून मोठ्या एलईडी टीव्ही आणि एअर कंडिशनरवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्याची भेट दिल्याने इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठाला ऐन सणासुदीच्या दिवसांत ‘अच्छे दिन’ येणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत, विक्रेत्यांना या दसऱ्याला विक्रीत 20 ते 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. जीएसटी कमी झाल्याची बातमी मिळताच, ग्राहक बुकिंगसाठी इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये पोहोचत आहेत. नवरात्रीत डिलिव्हरी घेण्याचा अनेकांचा बेत दिसत आहेत. विक्रेते जीएसटी कपातीला ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी फायद्याचे म्हणत आहेत. जीएसटीमुळे आतापर्यंत मागे हटलेले ग्राहक आता बाजारात येत आहेत. एसी, स्मार्ट टीव्ही, डिशवॉशरसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील जीएसटी कमी केल्यामुळे ग्राहकांचे 4000 ते 5000 रुपये वाचतील.
वाचा सविस्तर
09 Sep 2025 02:47 PM (IST)
बीड जिल्ह्यातील परळी शहरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. यात आणखी दोन जणांनी या प्रकरणात मदत केल्याचं देखील समोर आलं आहे.आठ दिवसात ही दुसरी घटना आहे. आता पुन्हा अशीच घटना परळीच्या बरकत नगर परिसरात घडल्याने परळी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
09 Sep 2025 02:20 PM (IST)
बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी दगडवाडी शिवारात दीपक बिल्ला (मूळ गाव मध्य प्रदेश) या मेंढपाळाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्येचं गूढं उलगडलं आहे.
09 Sep 2025 02:00 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा’ असं लिहिलेलं होत. ब्लॅकमेलिंगच्या तणावातून तरुणीने टोकाचं पाऊल उटलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
09 Sep 2025 01:40 PM (IST)
शहापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असतांना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
09 Sep 2025 01:20 PM (IST)
बीड जिल्हा कारागृहातील एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. बीड जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतले जात असल्याचं समोर आला आहे. सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात दहा वर्षांची जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्यांकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जात आहे. शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
09 Sep 2025 01:00 PM (IST)
वाशीम जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीला दवाखान्यात नेण्याच्या मामुली वादातून पतीने पत्नीवर धारदार शास्त्राने वार करून तिची हत्या केली. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना वाशीम जिल्ह्यंक्तही कोठारी गावात घडली आहे. या घटनेने वाशीम जिल्ह्या हादरून गेला आहे.
09 Sep 2025 12:45 PM (IST)
गुन्हेगारी विश्वात पाळला जाणारा एक अलिखीत नियम असतो. वैर-वैरातच ठेवायचे. कुटूंबिय, नातेवाईक, मित्र यांना स्पर्श करायचा नाही, अन् त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पहायचे नाही. सरकारी कायद्याप्रमाणेच हा नियम प्रत्येक टोळी पाळते. मात्र, आंदेकर व गायकवाड टोळीच्या युद्धाने हा नियम मोडला आहे. गेल्या वर्षभरापासून दोन टोळ्यांच्या संघर्षाने कुटुंबियांना टार्गेट करण्याचा नवा ट्रेंड सुरू करून ‘गुन्हेगारीतला नो-फॅमिली रूल’ बाद ठरवला आहे. याच नियमभंगातून गुन्हेगारीशी संबंध नसलेल्या दोन जणांचा बळी गेला. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ तर उडाली आहेच पण, हा नियमभंग आता आणखी किती जणांचा अशा पद्धतीने जीव घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
09 Sep 2025 12:23 PM (IST)
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे तुषार गारमेंटचे मालक सुनील खटावकर यांच्या घरात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेत घरात कोणी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. स्फोटात घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घराच्या खिडकीच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरापर्यंत पडल्या होत्या. यामुळे घरात आणि गल्लीत अक्षरशः काचांचा खच पाडला होता. घटना समजताच बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
09 Sep 2025 12:02 PM (IST)
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. दत्तवाडी आकुर्डी येथे शिवाजी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत लेजर बीम आणि डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याने मंडळाचा अध्यक्ष सुरज मारुती पिंजण (दत्तवाडी, आकुर्डी), डीजे चालक मालक आणि ट्रॅक्टर मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गरदरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
09 Sep 2025 11:42 AM (IST)
तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणातील पसार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनां देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण शिवाजी जमादार (वय १९, रा. सिंहगड महाविद्यालयाजवळ, वडगाव बुद्रुक), शुभम साधू चव्हाण (वय १९, रा. रियांश सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले व त्यांच्या पथकाने केली आहे.
09 Sep 2025 11:21 AM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवार पेठेत कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विसर्जन सोहळा सुरू असताना शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ही घटना रात्री घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ४५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अविनाश साप्ते यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.