फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
Deepika vs Alia Education: आज बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट गणल्या जातात. दोघींनीही कठोर परिश्रम आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र एक रंजक गोष्ट म्हणचे या दोघींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीसह त्यांचा शिक्षणाचा प्रवास वेगळा राहिला आहे. विशेष म्हणजे या दोघीच्या शिक्षणाचा विषय येतो तेव्हा या दोघींकडे कोणतीही मोठी पदवी नाही. चला तर मग यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊया..
दीपिकाने २०१७ मध्ये हेमा मालिनी यांच्या बायोग्राफी (आत्मचरित्र) लॉन्च दरम्यान आपल्या शिक्षणाबद्दल सांगितले की, खूपच कमी वयात तिला मॉडलिंग क्षेत्रात यश मिळाल्याने ती तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही. तीने १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढे एक वर्षांचा कोर्स देखील सुरू केला होता. परंतु, दिल्ली आणि मुंबई दरम्यान सतत प्रवास करावा लागत असल्याने ती तो कोर्स पूर्ण करू शकली नाही. त्यानंतर तिने डिस्टन्स एज्युकेशनच्या (दूरस्थ शिक्षण) माध्यमातून पदवी घेण्याचा प्रयत्न केला पण तोही अपूर्णच राहिला.
आलिया भट्ट्ने मुंबईतील प्रसिद्ध ‘जमनाबाई नरसी स्कूल’ मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. खूपच कमी लोकांना माहित आहे की, आलिया फक्त १० वी पास आहे. ती अभ्यासात बऱ्यापैकी उत्तम होती तिने १० वीच्या परीक्षेत सुमारे ७१ टक्के गुण मिळवले होते. वृत्तानुसार आलियाला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते, तिच्या या स्वप्नाला कुटुंबियांकडून ही पाठिंबा होता. याच दरम्यान तिला करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या ऑडिशनबद्द्ल माहिती मिळाली. यानंतर तिने अभिनयावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तचे शिक्षण १० वी नंतरच थांबले.
जर दीपिका आणि आलिया यांच्या शिक्षणाची तुलना केली असता, दीपिकाने १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे तर आलिया केवळ १० वी पास आहे. मात्र, या दोन्ही अभिनेत्रींनी हे सिद्ध करून दाखवले की, यश मिळवण्यासाठी मोठ्या पदवीची नव्हे तर कठोर परीश्रम, कौशल्य आणि समर्पणाची गरज असते. आज यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. अनेक लोक त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते शिक्षणापर्यंत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक असतात.






