स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप... 50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्टारलाईट ब्लॅक, स्टारलाईट ब्लू आणि स्टारलाईट रेड रंगाच्या पर्यायात खरेदी करू शकणार आहेत. ग्राहक फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाच्या वेबसाईटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Realme)
लाँच ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना 3,000 रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. तर ग्राहक 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआई पर्यायावर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 1000 रुपयांचा आणखी फायदा होणार आहे. Realme 16T स्मार्टफोनची प्री बुकिंग 26 मेपासून सुरु होणार आहे. स्मार्टफोनची विक्री 27 मेपासून सुरु होणार आहे.
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ 90.4 टक्के आहे.
टेक कंपनी रिअलमीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित रिअलमी UI 7 वर चालतो. यामध्ये स्प्लिट-स्क्रीन मल्टीटास्किंग, फ्लोटिंग विंडो, स्क्रीन रिकॉर्डिंग, ओप्पो शेयर आणि iOS फाइल शेयरिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत.
कंपनीच्या नव्या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी IMX852 प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा अपर्चर f/1.8 आहे, जो ऑटोफोकस सपोर्टसह येतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये रिअलमीचे लुमाकलर इमेज इंजिन दिले आहे, जे एआय प्रोसेसिंगच्या मदतीने स्किन टोन, टेक्चर आणि डायनमिक रेंज सुधारते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Realme 16T स्मार्टफोन 5G, VoWiFi, ब्लूटूथ 5.3, आयपीव्ही 6, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि बेईडू या कनेक्टिविटी पर्यायांनी सुसज्ज आहे. या फोनमध्ये IP69 रेटिंग दिली आहे. फोनमध्ये थर्मल मॅनेजमेंटसाठी व्हेपर चेंबर आणि ग्राफाइट कूलिंग सिस्टीम आहे. सिक्योरिटीसाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.
नव्या डिव्हाईसमध्ये 45W सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये बायपास चार्जिंग फीचर देखील आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, केवळ 104 मिनिटांत फोन फुल चार्ज केला जाऊ शकतो.






