राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २५ हुन अधिक कुत्र्यांना गोळ्या घालून ठार मारल्याची भयानक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचा वातावरण आहे. ग्रामस्थांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Pune News : पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये म्हटलं…
नेमकं काय प्रकरण?
एका गावात एक बदमाश बंदूक घेऊन फिरतोय आणि त्याला जिथे कुत्रा दिसतो तिथे तो त्याला त्याक्षणीच गोळी मारतो. एवढंच नव्हे तर कुत्रा दिसताच तो त्याच्या डबल-बॅरल बंदुकीने गोळ्या घालून त्यांची हत्याही करतो. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र कुत्र्यांच्या या हत्येमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून त्याने आतापर्यंत 25 हून अधिक कुत्र्यांना मारले आहे. ही घटना 2 ते 3 ऑगस्ट दरम्यानची आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दुहेरी बंदूक असलेला एक व्यक्ती दुचाकीवरून कुत्र्यांचा पाठलाग करताना आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना झुंझुनू जिल्ह्यातील नवलगढ पोलीस स्टेशन परिसरातील कुमावास गावातील आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. या सनकी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक करत आहे. हमीरी गावाच्या माजी सरपंच सरोज झझारिया यांनी कुत्र्यांना मारल्याबद्दल पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीत झझारिया यांनी असा दावा केला की, आरोपी शेओचंदने गेल्या काही दिवसांत 25 हून अधिक कुत्र्यांना मारले आहे. घटनेची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डुमरा येथील रहिवासी शेओचंद बावरिया नावाच्या व्यक्तीने कुत्र्यांना गोळ्या घातल्या होत्या.
पोलिसांनी या सनकी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे. आरोपीला अटक लवकरात लवकर केली जाणार असे पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.
सेवानिवृत्त शिक्षिकेची राहत्या घरी हत्या; CCTV ची डीव्हीआरही गायब, चिपळूणमध्ये खळबळ