साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी
भारतासह संपूर्ण जगभरात असंख्य मासेप्रेमी आहेत. मासे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे सगळ्यांच्या आवडीचे आहेत. दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत कायमच डाळ किंवा आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही जेवणात विविध प्रकार बनवून खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये प्रॉन्स करी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कोळंबीमध्ये कोणताही काटा नसतो, त्यामुळे सर्वच लहान मुले आवडीने कोळंबी खातात.गरमागरम वाफाळता भात आणि प्रॉन्स करी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणात चार घास जास्त जातात आणि पोट सुद्धा भरते. कोळंबीपासून वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवलेली प्रॉन्स करी नक्कीच बनवून पहा. चला तर जाणून घेऊया प्रॉन्स करी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






