काय घडलं नेमकं?
या प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव प्रताप गायकवाड असे आहे. प्रताप यांचा काही व्यक्तींशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच, प्रताप घरी जात असतांना आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केला. आपल्या मित्रांच्या मदतीने आरोपींनी प्रताप यांना वाटेत अडवले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पुण्यातील वारजे परिसरात गोळीबाराचा थरार! 5-6 जण सलूनमध्ये शिरले अन्…
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताणब्यांत घेतला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. हे कृत्य पूर्ववैमनस्यातून किंवा जुन्यवादातून घडल्याचे बोलले जात आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
नांदेड पोलिसांनी घरफोडी आणि चोरीच्या मालिकेतील गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत १९ गुन्हे उघडकीस आणले असून ४४.५ तोळे सोने, १७१.४ तोळे चांदी तसेच इतर मालमत्ता असा एकूण ७८ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पत्रकारांना दिली. भाग्यनगर, शिवाजीनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात आली. आरोपींनी विविध भागात घरफोड्या करून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सोहेब अब्दुल सत्तार (रा. जवाहरनगर नांदेड वय १९), प्रदीपकुमार विरेंद्रप्रसाद कौरी (रा.धनेगाव बळीरामपूर वय १९), अर्जुन पुरूषोत्तम मोरे (रा. चौफाळा मरघाट वय २८), शेख नईम शेख मैनोद्दीन (रा. कैलासनगर, नांदेड, वय २२), आशा हरिशचंद्र तेलंग (वय ५६ रा. शाहूनगर, नांदेड) अशी आरोपींची नावे आहे.
Ans: नांदेड शहरातील इंदिरा नगर परिसरात.
Ans: किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले.
Ans: तीन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.






