Russia-Iran मध्ये नेमकं शिजतंय काय? पुतिन-पेझेश्यियान यांच्यात हॉटलाईनवर गुप्त चर्चा; ट्रम्प-नेतन्याहूंचे टेन्शन वाढलं (फोटो सौजन्य: एआय डनरेटेड)
रशियातील इराणी राजदूत काजम जलाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर केलेल्या कारवाईनंतर रशिया आणि इराणमधील संबंधांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या ५६ दिवसांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी तीन वेळा हॉटलाईनवर संवाद साधला आहे. १२ एप्रिल रोजी त्यांची शेवटची चर्चा झाली होती. या चर्चेत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्रीही समील झाले होते. ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. परंतु नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र रशिया (Russia) पश्चिम आशिया युद्धात मध्यस्थीची भूमिका बजावण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी इराणच्या आर्थिक नसेवर आघात केला आहे. अमेरिकेने जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) वर नियंत्रण मिळवले आहे. जोपर्यंत इराण अटी मान्य करत नाही, शांतता करार होत नाही तोपर्यंत अमेरिकेचे होर्मुझवर नियंत्रण राहिल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याशिवाय इराणी जहाजांची नाकेबंदीही अमेरिकेने सुरुच ठेवली आहे.
ट्रम्प यांच्या मते होर्मुझ मार्ग खुला केल्यास इराणला दररोज सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सची कमाई मिळेल. यामुळे इराणचा आर्थिक स्त्रोत रोखण्याचा हेतू ट्रम्प यांनी स्पष्ट केला आहे. यामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर तात्पुरते वाढतील परंतु इरणला नमतं करण्यासाठी हे आवश्यत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची महत्त्वाच्या दौऱ्यासाठी शुक्रवारी (२४ एप्रिल) रात्री उशिरा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, त्यांनी अमेरिकेशी शांतता चर्चांच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची थेट चर्चा होणार नसल्याचे अराघची यांनी स्पष्ट केले आहे.
Ans: अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराण आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष संपर्कात आहे. दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत झाली आहे. रशिया मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणला राजकीय पाठींबा देण्याचा प्रयत्न करत आहे.
Ans: रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यात ५६ दिवसांत तीनवेळा हॉटलाईनवर चर्चा झाली आहे.
Ans: ट्रम्प यांच्या मते होर्मुझ मार्ग खुला केल्यास इराणला दररोज सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सची कमाई मिळेल. यामुळे इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी अमेरिकेने होर्मुझवर नियंंत्रण मिळवले आहे.






