Gondia Crime: धक्कादायक! अल्पवयीन मातेनेच एक दिवसाच्या अर्भकाला फेकलं विहिरीत; गोंदियातील घटना
झटापटीत लोखंडी प्लेट घुसली डोक्यात
तो रांजणगाव (शेणपुंजी) येथील शिवनेरी कॉलनीत एकटाच भाड्याने राहत होता. शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चंद्रमुनी हात्याच्या भावाच्या घरी आला होता. त्यानंतर तो अमोल गजानन खाडे व दीपक गुलाब लहाने तसेच चंद्रमुनीच्या कंपनीत काम करणारा लक्ष्मण ज्ञानेश्वर वाढेकर यांच्याकडे गेला. काही वेळाने ते चौघेजण चंद्रमुनोच्या दुचाकीवर बसुन तेथून युपी ढाबा येथे गेले. तेथे थोडा वेळ थांबून चंद्रमुनी काम करत असलेल्या साहिल ऑटो या टेक्नॉलॉजी कंपनीसमोर गेले. तेथे चंद्रमुनी व लक्ष्मण वाढेकर यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले. यावेळी त्यांच्यात चांगलीच हुज्जत होऊन लोटालोटी झाली. त्यात लक्ष्मण वाढेकर याने चंद्रमुनी यास ढकलुन दिल्याने तो त्या कंपनीसमोरील पार्किंग शेडमधील लोखंडी प्लेटवर पडला. त्या प्लेटचा कोना चंद्रमुनीच्या डोक्यास लागल्याने तो जखमी होऊन तेथेच बेशुद्ध पडला.
वाळूज पोलिसांकडून तपास सुरू
हा प्रकार पाहून कंपनीतील रविद्र भगवान हिवाळे व वॉचमन बापुराव शिंदे तसेच कंपनीतील इतर कामगार आले. त्याचवेळी लक्ष्मण वाढेकर हा तेथून पळून गेला. चंद्रमुनी बेशुद्ध पडल्याने कंपनीतील एच आर शिवशंकर सविता तसेच रविंद्र हिवाळे, कैलास बोबडे व अभिषेक जाधव यांनी चंद्रमुनी यास उपचारार्थ प्रथम बजाजनगर येथील खाजगी दवाखान्यात व त्यानंतर घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन चंद्रमुनी यास मयत घोषीत केले. याप्रकरणी अमोल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मण ज्ञानेश्वर वाढेकर रा जामवाडी, जि जालना याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: चंद्रमुनी साहेबराव कांबळे (२५), मूळचे हिंगोलीचे, वाळूजमध्ये चालक म्हणून काम करणारे.
Ans: आरोपी लक्ष्मण वाढेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस तपास सुरू आहे.
Ans: क्षुल्लक वाद आणि अचानक झालेली ढकलाढकली हीच मृत्यूची कारणीभूत ठरली.






