अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात एटीएसने (Gujarat ATS) भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची (Pakistan) बोट जप्त केली. या कारवाईमध्ये २०० कोटी रुपयांचे ४० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. पुढील तपासासाठी बोट आणि बोटीचे पाकिस्तानी चालक यांना जाखू (Jakhau) येथे आणण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून गुजरात एटीएसकडून अमलीपदार्थविरोधी कारवाई (Anti Narcotics Operation) सुरू आहे.
In joint operation, Indian Coast Guard & Gujarat ATS apprehended a Pakistani boat 6 miles inside Indian waters with 40 kgs of drugs valued at Rs 200 cr. Two fast attack boats of ICG caught Pakistani boat 33 nautical miles off Jakhau coast in Gujarat: ICG officials
— ANI (@ANI) September 14, 2022
गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारवाईत तब्बल २०० कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये ४० किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात होते. कारवाईत गुजरात पोलीस तटरक्षक बल, एनसीबी, पंजाब, दिल्ली पोलीस आणि अन्य एजन्सीने संयुक्त मोहीम राबवत ही कारवाई केली होती. या कारावाईमध्ये १२ गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आलेले २०० कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते.