काय घडलं नेमकं?
पीडितेचे आई-वडील, शेजारीचं राहणारे आज्जी-आजोबा आणि काका मजुरी करतात. याचं पीडित कुटुंबाच्या बाजूलाचं राहणारा नराधम, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा ही मजुरीचंच काम करतं. इयत्ता चौथीमध्ये शिकणारी दहा वर्षीय पीडिता नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शाळेत गेली. अकरा वाजता ती घरी येईपर्यंत आई-वडील आणि शेजारी राहणारे आज्जी-आजोबा काका असे सगळेच कामावर गेले होते. तर शेजारी राहणाऱ्या नराधमाच्या बायको आणि मुलगा ही मजुरी करायला गेले. नराधम मात्र घरीच थांबला होता. त्यावेळी दहा वर्षीय पीडिता आणि तिची चार वर्षीय बहीण घरातली आवराआवर करत होते. दुपारच्या वेळी दहा वर्षीय पीडित कपडे धुण्यासाठी बाहेर आली. तेव्हा नराधमाने तिच्या आजू बाजू कोणी नसल्याचे पाहून पीडितेच्या तोंड दाबून लगतच्या स्वतःच्या घरी घेऊन गेला.
हे सगळं एका महिलेनं पाहिलं. ही महिला पीडितेच्या आई-वडील कामावरून यायची वाट पाहत राहिली. संध्याकाळी ते घरी येण्यापूर्वी नराधमाने अत्याचार करून पीडितेला सोडून दिलं होत. तिला घरी सोडण्यापूर्वी घरच्यांना सांगितलं तर तिचं चाकूने पोट कापेन अशी धमकी दिली. शेजारच्या महिलेने पीडितेच्या आई-वडिलांना गाठलं, दुपारी जे घडलं ते सांगितलं. मग पीडितेच्या आईने विश्वासात घेऊन विचारलं असता, पीडितेने घडलेला सगळा प्रकार सांगितला.
चार वर्षीय बहिणीवर…
पहिल्यांदा अत्याचार मे महिन्यात झाला होता. एकूण तीन वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या नराधमाने काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बहिणीला ही एकदा तोंड दाबून घरी नेले होते. हे ऐकताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मग कुटुंबाने वाकड पोलीस स्टेशनला जाऊन 65 वर्षीय नराधम रमजान विरोधात फिर्याद दिली, त्यानुसार नराधमावर पॉक्सो आणि येट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तातडीनं नराधमाला बेड्या ही ठोकल्या आहेत.
पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री, पाच जणांना ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ बाटल्या जप्त
Ans: 65 वर्षे.
Ans: दोन.
Ans: वाकड पोलीस ठाणे.






