क्लायमेट चेंजचा थेट झोपेवरच हल्ला! जगभरात वर्षाला ५६ तास झोप गायब; भारतात स्थिती अधिक गंभीर
जगभरात वेगाने होणाऱ्या हवामान बदलाचे आणि वाढत्या तापमानाचे भीषण परिणाम मानवाच्या आरोग्यावर थेट दिसू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे केवळ दिवसच नव्हे, तर रात्रीही तापू लागल्याने जगभरातील लोकांची झोप उडाली आहे. ‘क्लायमेट सेंट्रल’च्या अहवालानुसार, रात्रींमुळे जगातील सामान्य कमी होत आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसत असून दक्षिण आणि किनारपट्टीच्या भागातील नागरिकांची वर्षाला तब्बल ९० तासांपेक्षा जास्त झोप हिरावली जात आहे. ‘क्लायमेट सेंट्रल’ ने जगभरातील १,३३८ शहरांचे विश्लेषण केले आणि असे आढळले की, हवामान बदलामुळे झोपेचे हे नुकसान १९७० च्या दशकाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे.(फोटो सौजन्य – istock)
झोपेवर होणारा हवामान बदलाचा परिणाम जगातील उष्ण प्रदेशांमध्ये सर्वाधिक तीव्र आहे. उष्णतेमुळे झोप कमी होण्याचे प्रमाण मध्यपूर्वेतील शहरांमध्ये सर्वाधिक आढळले, तर दक्षिण आशिया, आग्नेय आशिया आणि पश्चिम आफ्रिकेतील काही भागांमध्येही याचे लक्षणीय परिणाम दिसून आले. क्लायमेट सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, दक्षिण भारत आणि आग्नेय आशियातील काही शहरांमधील रहिवाशांची रात्रीच्या वेळी वाढत्या तापमानामुळे वर्षाला ७८ ते ९१ तास झोप कमी झाली.
मुंबईत वर्षाला सरासरी ८४ तास आणि विशाखापट्टणममध्ये ८७ तास झोप कमी झाल्याची नोंद झाली. याउलट, थंड प्रदेशांमध्ये कमी परिणाम दिसून आला; उदाहरणार्थ, श्रीनगरमध्ये वर्षाला २७ तास झोप कमी झाल्याची नोंद झाली आहे.या रिपोर्टने भारतीयांची चिंता वाढवली आहे. कारण दक्षिण आणि किनारपट्टीवरील विशेषतः चेन्नई, नेल्लोर आणि पुद्दुचेरी शहरांमधील रहिवाशांची दरवर्षी ९० ते ९३ तास झोप कमी होत आहे.तिरुचिरापल्ली, कोची, कोझिकोडे आणि गुंटूर ही शहरेही सर्वाधिक प्रभावित भारतीय शहरांच्या यादीत आहेत; येथे उष्ण रात्रीमुळे रहिवाशांची वर्षाला सुमारे ९० तास झोप कमी होत आहे.भारतीय शहरांमध्ये झोप कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे काळाच्या ओघात रात्रीच्या किमान तापमानात झालेली वार्षिक वाढ.१९९१ ते २०२० या काळात रात्रीचे सरासरी तापमान १९.३ अंश सेल्सिअस इतके होते.
Ans: वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण होते. त्यामुळे झोप लागण्यास उशीर होतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.
Ans: होय. दीर्घकाळ अपुरी झोप झाल्यास थकवा, तणाव, एकाग्रता कमी होणे, हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: उष्ण हवामान, वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा, वाढते शहरीकरण आणि रात्रीचे उच्च तापमान यामुळे भारतातील अनेक भागांमध्ये झोपेवर अधिक परिणाम होत असल्याचे विविध संशोधनांतून दिसून आले आहे.






