संग्रहित फोटो
इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, सध्या रा. महिपालपूर, दिल्ली, मूळ रा. नौनेर, अमरोही, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव व त्यांच्या पथकाने केली आहे.
बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकात (दि. २० जुलै) रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठाला रिक्षाने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर नागरिक घटनास्थळी जमल्याने रिक्षाचालक गुर्जरने ज्येष्ठाला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जातो, अशी बतावणी केली. तेथून नागरिकाला रिक्षात घालून सुटका करुन घेतली. मात्र, गंभीर जखमी ज्येष्ठाला रुग्णलायात उपचारासाठी दाखल न करता गुर्जरने रिक्षा गणेशखिंड रस्तामार्गे खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेली. लोहमार्गाजवळील दाट झाडीत जखमी अवस्थेतील ज्येष्ठाला सोडून गुर्जर पसार झाला.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने ते बेपत्ता झाल्याची तक्रार बाणेर पोलिसांत दिली. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह खडकी येथील लोहमार्गाजवळ सापडला. त्यांच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटविली. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ज्येष्ठ नागरिकाला रिक्षाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. रिक्षाचालकाने त्यांना रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात नेले होते, अशी माहिती मिळाली. सीसीटीव्ही पडताळून पोलिसांनी तपास सुरू केला.
रिक्षाचालक दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांचे पथक तेथे गेले. महिपालपूर परिसरात आठ दिवस रिक्षाचालक गुर्जरचा शोध घेला. त्याला तेथून ताब्यात घेण्यात आले. गुर्जरला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.






