spa centre (फोटो सौजन्य - pinterest)
लातूर जिल्ह्यतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेलं देह व्यापाराचे रॅकेट उघडकीस आलं आहे. यातून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांनी एकूण सहा लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हशीला ज्या साखळीने बांधले त्याच साखळीने पतीला बांधले त्यानंतर…..; पोलिसांनाही बसला धक्का
नेमके काय घडले?
लातूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रिंग रोड भागात एका स्पा सेंटरमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती लातूर पोलिसांना मिळाली होती. याबाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवला. ही माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी लातूर पोलिसांनी स्पा सेंटरवर धडक कारवाई केली. यात तीन महिलांना अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग पथकाने सोडवले. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढून अनैतिक धंद्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले. आता पर्यंत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपीला अटक केली आहे तर तीन आरोपी सध्या फरार आहे. त्यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्य राज्यांमधून महिलांना स्पा सेंटरवर आणले जात होते. महिलांना सक्तीने या धंद्यात उतरवले जात असल्याचे समोर आले आहे. लातूर पोलीस सध्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का? हे सेक्स रॅकेट स्थानिक पातळीवरच मर्यादित नसून त्याचे धागेदोरे अन्य राज्यांपर्यंत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. स्पा सेंटरच्या अवैध धंद्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
म्हशीला ज्या साखळीने बांधले त्याच साखळीने नवऱ्याला बांधेल
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला म्हशीला बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साखळ्यांनी बांधण्यात आले आणि त्यानंतर घरा बाहेर हाकलून लावले. साखळी काढता येऊ नये म्हणून त्याला लॉक लावण्यात आला. पीडित व्यक्ती या अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलिसांनी कुलूप काढण्यासाठी चावीवाल्याला बोलावले आणि साखळी काढली. यानंतर त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशमधील विष्णुगड पोलीस स्टेशन परिसरातील छछोनापूर गावात घडली आहे.