कसा समोर आला कट?
१७ डिसेंबर रोजी ही घटना घडली. राम याने पोलिसांना सांगितले होते की, एक मुखवटाधारी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने कार्यालयात शिरला त्याने कल्याणी यांचे दागिने चोरले आणि तिथे आग लावून पळून गेला. त्यात कल्याणी यांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर राम स्वतः किरकोळ भाजला होता. मात्र पोलिसांच्या तपासात राम याने रचलेला हा बनाव फसला.
रामच्या केबिनमध्ये पेट्रोल भरलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि दुचाकीतून पेट्रोल काढण्यासाठी वापरलेली नळी सापडली. पोलिसांनी ते सगळं जप्त केलं आहे. चौकशीदरम्यान रामने दिलेल्या जबाबांमध्ये वारंवार तफावत आढळल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. कल्याणी यांनी त्या रात्री मुलाला फोन करून पोलिसांना कळवण्यास सांगितले होते, हा पुरावा निर्णायक ठरला.
हत्या कारण्यामागेचे कारण काय?
तर कल्याणी यांच्याजवळ राम यांची तक्रार विमान एजंटनी केली. राम याने 40 हून अधिक ‘डेथ क्लेम्स’ (मृत्यू दावे) प्रलंबित ठेवले आहेत असे त्यांनी कल्याणीला सांगितले. कल्याणी यांनी याबाबत रामला जाब विचारला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणार असल्याचे सांगितले. आपला भ्रष्टाचार उघड होईल या भीतीने रामने कल्याणी यांचा काटा काढण्याचे आणि फायली जाळून टाकण्याचे ठरवले.
कशी केली हत्या?
रात्री 8.30 च्या सुमारास रामने इमारतीचा मुख्य वीजपुरवठा बंद केला आणि दुरुस्तीसाठी वीज बोर्डाला खोटा ईमेल पाठवला. कल्याणी बाहेर पडू नये म्हणून त्याने मुख्य काचेच्या दरवाजाला साखळी लावून कुलूप ठोकले. त्यानंतर त्याने पेट्रोल ओतून आग लावली. कल्याणी मदतीसाठी ओरडत असतांना रामने त्यांच्यावर पेट्रोल ओतून आग आणखी भडकवली. त्यानंतर स्वतःच्या केबिनलाही आग लावून याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. यवत तो स्वतः देखील थोडा भाजला.
पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले
Ans: तामिळनाडूतील मदुराई येथील LIC इमारतीत.
Ans: वरिष्ठ शाखा व्यवस्थापक ए. कल्याणी नम्बी.
Ans: प्रलंबित डेथ क्लेम्सचा भ्रष्टाचार लपवणे.






