खळबळजनक ! पती-पत्नीमधील वाद टोकाला; पतीने गळा दाबून केली पत्नीची हत्या (संग्रहित फोटो)
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच फ्लॅट घेण्यावरून पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला. याच वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. ही घटना बावधन येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी आरोपी पतीला बावधन पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केलं.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा प्रकाश जाधव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रकाश जाधव असं आरोपी पतीचे नाव आहे. फ्लॅट घेण्यावरून पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत होते. घरात आर्थिक चणचण देखील होती. प्रकाश जाधवची नुकतीच स्कूल बसवरील नोकरी देखील गेली होती. त्यामुळे तो घरीच असायचा. मिळालेल्या वेळेत तो रिक्षा चालवायचा. संसाराचा उदरनिर्वाह भागवायचा. पत्नी मनीषा आणि प्रकाश जाधव यांच्यात दररोज किरकोळ कारणावरून वाद व्हायचे.
हेदेखील वाचा : भरदुपारी अल्पवयीन मुलाचा हात मनगटापासून कापला! रक्तरंजित हल्ल्याने परिसरात तणाव
दरम्यान, मंगळवारी दुपारी याच रागातून प्रकाश जाधवने पत्नी मनिषाचा घरात कुणी नसताना गळा दाबून हत्या केली. तो तिच्या मृतदेहाचा शेजारी काही वेळ बसून होता. काही वेळाने मोठा मुलगा घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला. काही वेळ दरवाजा उघडलाच नाही. अखेर काही मिनिटांनी दरवाजा उघडण्यात आला.
मनीषा बेडवर पडली होती निपचित
मनीषा ही बेडवर निपचित पडल्याचं पाहून मुलाने वडील प्रकाश जाधव यांना रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितली. प्रकाश हा तसाच फरार झाला. मनिषाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. बावधन पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. सोलापूरच्या दिशेने फरार झालेल्या प्रकाशला काही तासांतच अटक करण्यात आली आहे. तपास बावधन पोलीस करत आहेत.
हेदेखील वाचा : धक्कादायक! जबरदस्तीने मित्राला लिंगबदल करण्यास भाग पाडून बलात्कार, १० लाख दिले नाही तर आयुष्य…