प्रवासादरम्यान महिला रेल्वे प्रवाशांच्या वस्तूंची चोरी; रेल्वे क्राईम ब्रांचने तिघांना ठोकल्या बेड्या
Kalyan Crime : रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. महेश धग असे या चोरट्याचे नाव आहे. विशेष म्हणजे चोरलेले दागिने महेश झावेरी बाजार येथील ज्वेलर्स दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना विकण्यासाठी द्यायच्या .हे कामगार चोरलेले दागिने विकून महेशला पैसे द्यायचे. रेल्वे पोलिसांनी महेशला साथ देणारे या दोन ज्वेलरी शॉपच्या कामगारांना देखील अटक केली आहे. नितीन येळे आणि तानाजी माने असं या दोन कामगारांची नावे आहे. रेल्वे पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले दागिने मोबाईल आणि काही रोकड हस्तगत केलं आहे. या तिघांनी मिळून अशाप्रकारे किती गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत.
रात्री अपरात्री येणाऱ्या व जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपेत असलेल्या महिला प्रवाशांच्या पर्समधून मौल्यवान दागिने व महागडे मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर या चोरट्यांचा शोधासाठी कल्याण लोहमार्ग पोलीस या मेल एक्सप्रेस मध्ये गस्त घालत होते . याच दरम्यान एक सराईत चोरटा कल्याण रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती कल्याण रेल्वे रेल्वे शाखेच्या पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचत महेश घाग या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्या. महेशच्या चौकशी दरम्यान महेशने तीन गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच महेश चोरी केलेले दागिने मुंबई झवेरी बाजार येथील तानाजी माने व नितीन येळे या दोन सोनारांना विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.हे दोघे सोनार चोरीचे दागिने वितळवून लगड बनवून विकत होते . पोलिसांनी चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या या दोन्ही सोनारांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून चोरी केलेल्या दागिन्यांपासून बनवलेल्या सोन्याच्या लगडी ,मोबाईल फोन ,रोख रक्कम असा 9 लाख 68 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहेत