मित्राने केली मित्राची हत्या (संग्रहित फोटो)
शिरोली : कासारवाडी सादळे मादळे घाटामध्ये वनविभागाच्या हद्दीत एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभांगी सचिन रजपूत (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या पतीनेचं धारधार शस्त्राने वार करुन खून केला आहे. सचिन चंद्रशेखर रजपुत (रा कळबळगी बागलकोट, कर्नाटक) असे आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन व शुभांगीचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्यांना एक मुलगा आहे. सचिन सैन्यामध्ये नोकरीला होता. कुटुंबासह दिल्ली मध्ये राहत होता सचिन आणि शुभांगीमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते. ससतच्या वादाला व त्रासाला कंटाळून शुभांगी आपल्या वडीलांकडे (निलजी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथे निघून आली होती. गेली काही वर्षे ती चार वर्षांच्या मुलासह आई वडीलांसोबत राहत होती तर सचिनचे गावांमध्ये इतरांशी वाद झाले होते. यामुळे चार वर्षे नोकरीवर नव्हता तसेच तो गावातून गायब होता.
पंधरा दिवसांपासून सचिन (निलजी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथे जाऊन शुभांगीचे आई वडीलांना भेटून मी नोकरी करतो व्यवस्थित राहातो असे सांगून शुभांगीला घेऊन आला. नोकरीनिमित्त तो हनुमान नगर शिये (ता. करवीर) येथे पंधरा दिवसांपासून राहू लागला. गुरुवारी सायंकाळी दोघे जोतिबा दर्शनासाठी गेले. दर्शनानंतर घरी परतत असताना कासारवाडी सादळे मादळे घाटामध्ये नंबर नावाच्या शिवारालगत वन विभागाच्या हद्दीमध्ये दोघेजण बोलत बसले. त्या ठिकाणी सचिन रजपूत यांने शुभांगी रजपूत हिच्या गळ्यावर, चेहऱ्यावर अन् पोटावर धारदार चाकूने वार केले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह तेथेच टाकून सचिन हा सोलापूर येथे निघून गेला. सकाळी सात वाजता सोलापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर होऊन खुनाबाबत कबुली दिली. शिरोली पोलीस स्टेशनला खुनाची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहायक फौजदार प्रमोद चव्हाण, अमित पांडे, निलेश कांबळे, पोलिस पाटील महादेव सुतार, शोभा कांबळे यांच्यासह पोलीस पथक कासारवाडी घाटात दाखल झाले. सचिनने दिलेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण घाट पिंजून काढला असता वनविभागाच्या हद्दीत रस्त्यापासून पन्नास मिटरच्या अंतरावर दगडामध्ये शुभांगीचा मृतदेह आढळून आला. शुभांगीच्या चेहऱा, गळा व पोटावर चाकूने वार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता सरकारी दवाखान्यात पाठवला. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे .