Photo Credit- Social Media असा रचला होता बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट
Baba Siddique Death Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या ह्त्येप्रकरणी दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. या तपासात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार गौतम तब्बल अर्धा तास हॉस्पीटलबाहेर उभा होता. धक्कादायक म्हणजे, ज्या दिवशी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या 10 दिवसांनीच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर 10 दिवसांनंतरच लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रचला होता. तत्पूर्वी सलमानच्या घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार झाला होता. सलमान खानला मारण्याचा प्लॅन होता. पण तो प्लॅन अयशस्वी झाल्याने बिश्नोई गँगने त्याच्या घरावर गोळीबार करत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सलनान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू झाला. मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच बाबा सिद्धीकी यांना मारण्याचा प्लॅन सुरू झाला होता. सलमान खानच्या घरावरच्या गोळीबारानंतर बिश्नोई गँगने आपल्या गुंडांना त्याच्या जवळच्या लोकांना टार्गेट कऱण्याचे आदेश दिले होते. या योजनेंतूनच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट रटला गेला.
17 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांचा नायजेरिया दौरा; होणार द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर चर्चा
बिष्णोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता. गोळीबार करणाऱ्यांशी आणि या प्लॅनमध्ये सहभागी असलेल्या त्यांचया साथीदारांशी संवाद साधण्यासाठी हायटेक बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा वापर करण्यात आला होता. या टेलिफोन एक्सचेंजा बेकायदेशीर रित्या वापर करून अनमोल बिश्नोईने शुटर शिवकुमार गौतम, झिशान अख्तर, शुभम लोणकर आणि सुजित सिंग यांच्याशी अनेकदा संवादही साधला होता. अशी माहिती क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आली आहे.
तपास यंत्रणां त्यांच्यापर्यंत पोहचू नयेत, यासाठी बिश्नोई गँगने या टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता. त्यासाठी त्यांन स्वत:चे स्वतंत्र असे टेलिफोन एक्सचेंज सुरू करून घेतलं. अनमोल बिश्नोईसोबत आणखी चार-पाच जणही आहेत. कोणत्याही प्लॅनमध्ये अनमोल सर्वात शेवटी दाखल होऊन मार्गदर्शन करतो.त्यामुळे त्याच्याबद्दल तपास यंत्रणांना कोणतेही पुरावे मिळत नाही, असंही क्राईम ब्रांचच्या तपासात समोर आले आहे.
Smartphone Tips: ऑनलाईन फाइल शेअरिंग करताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात