बीड : बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. आता त्याच व्यक्तीच्या तीन वर्षाच्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. बीड जवळील इमामपूर रोड परिसरात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच याच चिमुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. जयराम बोराडे असे चिमुकलीच्या मृत वडिलाचे नाव आहे. या घटनेने बीडमध्ये आता खळबळ उडाली आहे.
चिमुकली होती बेपत्ता
चिमुकली ही आपल्या वडिलांसोबत दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. तिचा शोध सुरु होता. त्यात आज सकाळी जिथे तिच्या वडिलांचा मृतदेह सापडला त्याच परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमागील कारण अद्यापही समजू शकले नाही आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलिस करत आहेत, तर दोघांचा मृतदेह अशा अवस्थेत आढळून आल्याने हे कोडं सोडवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला दिसला मृतदेह
आज सकाळी बीड तालुक्यातील रामगड परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या दुहेरी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कारण पोलीस तपासात समोर
त्यांनी नेमकी आत्महत्या का केली आणि चिमुरडीला का गळफास दिला? हे पोलीस तपासामध्ये लवकरच समजेल. मात्र ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. दोघे घरातून बाहेर पडलेले होते. घरचे यांचा शोध घेत होते, दोन दिवसांपूर्वी वडील आणि आज चिमुरडी अशा अवस्थेत आढळून आल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
लग्नाच्या दोन महिन्यात नवविवाहितेने संपवलं आयुष्य
दरम्यान, बीडमधून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. सासरचे मंडळी हुंड्यासाठी त्रास देत होते. या त्रासामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आला आहे. लग्नाला केवळ २ महिनेच झाले होते. दोन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. अवघ्या एक महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी पाच लाख रुपयांची मागणी करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर मला तू आवडत नाहीस, तुझ्यासोबत राहायचं नाही असं तिचा नवरा तिला म्हणत त्रास देत होता. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सोनाली बाळू वनवे (वय २२) असे आहे.
स्वत:च्या लग्न खर्चासाठी भरदिवसा चोरी, बंटी- बबली पोलीसांच्या जाळ्यात