Photo Credit- vanraj Andekar @ Facebook
पुणे : काही दिवासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भररस्त्यात गोळ्या झाडून ह्त्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 संशयितांना अटक केली असून या हत्याप्रकरणाचा त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच एक मह्त्ताची अपडेट समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचं खरं कारण शोधून काढण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज यांच्याहत्येचा मुख्य सुत्रधार हा सोमनाथ गायकवाड हा असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कौटुंबिक आणि संपत्तीचा वाद तसेच पूर्ववैमानस्यातून बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड यांनीच वनराज यांची हत्या केली असावी असेही सांगितले जात आहे.
हेही वाचा : Vanraj Andekar: सख्ख्या बहिणींनींच घडवून आणली वनराज आंदेकरांची हत्या; पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक
दरम्यान, काही महिन्यापूर्वी वनराज यांनी बहीण संजीवनी कोमकर आणि त्यांचे पतीचे किराणा दुकान पाडले होते. त्यावरून भावा बहीणीत मोठावाद झाला होता. याच वादातून वनराज यांची हत्या केल्याचा आरोप करत वडील सुर्यकांत आंदेकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
याशिवाय गेल्यावर्षी ऑक्टोबर 2023 मद्ये सोमनाथ गायकवाड यांचा साथीदार निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाला होता. दोघांवरही कोयता आणि स्क्रू-ड्रायव्हरने वार कऱण्यात आले होते. या हल्ल्यात यात निखिल यांचा जागीच मृत्यू झाला. पण वनराज यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला असावा असा संशय सोमनाथ गायकवाड यांना होता. याच हत्येचा बदला घेण्यासाठी गायकवाड यांनी वनराज यांचा खून केला असावा, अशी माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा: Vanraj Andekar: एक फोन अन् वनराज आंदेकरांचा खेळ ‘खल्लास’; पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली धक्कादायक माहिती
आपल्या साथीदारांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाडने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्यासोबत हातमिळवणी करून वनराज यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोरआली आहे, त्याचबरोबर त्यांच्या हत्येमागे आणखीही काही कारणे असावीत. अशीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुणे पोलीस या हत्येचा तपास करीत आहेत.






