Photo Credit- Social Media NDAमध्ये आमच्यावर अन्याय होतोय, रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत
निलंगा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींकडून प्रचारसभाही घेतल्या जात आहेत. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सतत छळले, लोकसभा निवडणुकीत त्यांना दोनदा पराभूत केले, त्या काँग्रेसला हद्दपार करा’, असे आवाहनच मतदारांना केले आहे.
हेदेखील वाचा : Sharad Pawar : ‘म्हणून मोदींना ते पाप करता आलं नाही’: जामनेरमधून शरद पवारांची घणाघाती टीका
माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारासाठी रामदास आठवले निलंगा येथे आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले. संभाजी निलंगेकरांना बहुमताने चौथ्यांदा विधानसभेत पाठवा. मंत्री करण्याची जबाबदारी माझी असल्याचे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिले.
आठवले पुढे म्हणाले, मागील 65 वर्षांमध्ये काँग्रेसने केवळ जातीपातीचे राजकारण केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधीने फेकाफेकी केली. परंतु, संविधानामुळे देशाच्या सर्वोच्च पदावर एक सामान्य माणूस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षमपणे काम करत आहेत.
…तोपर्यंत संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही
खासदार अमर साबळे म्हणाले की, जोपर्यंत या पृथ्वीतलावर चंद्र, सूर्य, तारेआहेत, तोपर्यंत संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, आणि तो आजपर्यंत कोणी पैद ही झाला नाही. काँग्रेस संविधानाचे राजकारण करून समाजात फूट पाडत असल्यास आरोप त्यांनी केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना छळण्याचे काम एकमेव काँग्रेस पक्षाने केले आहे. व बाबासाहेबांना पराभूत करण्याचे पाप काँग्रेसने केले.
काँग्रेस पक्षाचे संविधानाचे प्रेम म्हणजे…
खऱ्या अर्थाने संविधानाला धक्का पोहोचविण्याचे काम शहाबानो प्रकरणात काँग्रेसने केले आहे. असे साबळे यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस पक्षाचे संविधानाचे प्रेम म्हणजे ‘मगरमच्छ के आंसू’सारखे आहे, अशी खोचक टीकाही साबळे यांनी केली.
संभाजीराव निलंगेकरांच्या पाठीशी खंबीरपणे राहा
सध्याच्या केंद्र व राज्य शासनाने महायुतीच्या सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले असून इंदू मिलची सहाशे कोटींची जमीन दिली, त्या जमिनीवर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे स्मारक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची कामे सक्षमपणे सुरू आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा, असे आश्वासनही केंद्रीय राज्यमंंत्री रामदास आठवले यांनी केले.
हेदेखील वाचा : Maharashtra Election: “स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांचे…”; दिंडोशीतून उद्धव ठाकरेंविरुद्ध ‘राज’तोफ धडाडली