IND Vs ZIM Live Streaming (फोटो- ट्विटर)
झिम्बाब्वेची फलंदाजी
भारताने झिम्बाब्वेच्या संघाला 220 रन्सचे टार्गेट दिले होते. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी सलामीची जोडी म्हणून डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी 32 आणि 1 रन्स करून आउट झाले. डिओन मायर्सने 12 रन्सची खेळी करून आउट झाला. रायन बर्ल देखील 15 रन्सवर आउट झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा अपयशी ठरला. तो शून्यावर आउट झाला. वेस्ली माधेवेरे केवळ 2 रन्सवर आउट झाला. ब्रॅड इव्हान्स 19 रन्सवर आउट झाला.
That maiden wicket feeling 🥳 Yash Thakur opens his wicket-taking account for #TeamIndia 👏👏 Updates ▶️ https://t.co/Z8UUziVx8d#ZIMvIND pic.twitter.com/WFLl2yGPOG — BCCI (@BCCI) July 25, 2026
भारताची गोलंदाजी
220 रन्सचा बचाव करण्यासाठी भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. त्यांनी पहिल्या काही ओव्हर्समध्येच झिम्बाब्वेच्या संघाची वाट लावून टाकली. प्रिन्स यादवने महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या. तर यश ठाकूर, रवी बिश्नोई, शिवम दुबेने प्रत्येकी 1 विकेट घेतली. पहिलाच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यश ठाकूरने देखील एक विकेट घेतली.
झिम्बाब्वेची गोलंदाजी
झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये झिम्बाब्वेने भारताच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना आउट केले. ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड न्गारावा आणि न्यूमन न्यामहूरी तसेच ब्रायन बेनेट या गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव.
खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.






