आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचे कौतुक आदिनाथ कोठारेच्या भूमिकेचे कौतुक
Detective Dhananjay सिरीज का पहावी, 5 कारणं; तुमचा विकेंड करेल स्पेशल
पहिल्यांदाच मराठी ओटीटीवर
हिंदी इंग्रजी सिनेविश्वात आणि ओटीटी वर या आधी प्रेक्षकांनी अनेक डिटेक्टिव्ह शो पाहिले पण मराठीत ओटीटी विश्वात पहिला वहिला डिटेक्टिव्ह होण्याचा मान आदिनाथ कोठारे ने पटकावला आहे आणि हा डिटेक्टिव्ह लोकांना खिळवूनदेखील ठेवतोय.
आदिनाथ कोठारेने आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या असून ही भूमिका त्याचासाठी खास का आहे यावर तो सांगतो “मी प्रयत्न करत होतो की मराठीत एक आयकॉनिक डिटेक्टिव घेऊन यावा आणि श्रीरंग गोडबोले यांच्या सोबतीने तो प्रयत्न यशस्वी झाला आहे. त्यांच्या दिग्दर्शनात तयार झालेली हि सीरिज नक्कीच प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. मराठी ओटीटी विश्वातला पहिला वहिला डिटेक्टिव्ह साकारण्याची मला संधी या निमित्तानं मिळाली आहे याचा खूप आनंद आहे”
धनंजयचे पात्र उलगडणार
“डिटेक्टिव धनंजय “ ही वेब सीरिज श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या मराठी इंडस्ट्री मधली दोन बड्या निर्मिती संस्थानी एकत्र येऊन निर्मित केली आहे. कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेबशो मधून उलगडणार आहे . ओटीटी विश्वात आदिनाथने पुन्हा एकदा जोरदार धमाका केला आहे आणि त्याचा लूक ने सगळ्याचं लक्ष वेधून घेतल आहे. करारी नजर आणि आदिनाथचा डिटेक्टिव अंदाज चर्चेचा विषय ठरतोय. येणाऱ्या काळातदेखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार असून तो अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.
याबाबत आदिनाथने ‘नवराष्ट्र’ला दिलेल्या मुलाखतीमधा्ये सांगितलं होतं की डिटेक्टिव्ह धनंजय नक्की कसा आहे आणि त्याची छोटूशी मैत्री कशी आहेत. याशिवाय या दोघांमधील केमिस्ट्री कशी आहे. या दोघांची केमिस्ट्री खूपच गंमतीशीर असून प्रेक्षकांना ही जोडी नक्की आवडेल असंही पुष्कराज आणि आदिनाथ या दोघांनी सांगितलं.






