अमित शाहा यांच्या भेटीनंतर मुख्यमत्र्यांनी स्पष्टच सांगितलं! म्हणाले.... (Photo Credit - X)
माहितीनुसार, विधानपरिषदेच्या १७ पैकी तब्बल १२ जागांवर भाजप स्वतः निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. उर्वरित ५ जागांपैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याबाबत महायुतीत प्राथमिक चर्चा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीत होते आणि तेथे वरिष्ठ पातळीवर प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर विधानपरिषद निवडणुकांवर थेट भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीबाबत आमचं जागावाटपाचं जवळपास ‘अॅग्रीमेंट’ झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जागा आम्हाला मिळावी, असा भाजपचा आग्रह आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. सध्या याच दोन-तीन जागांवरून आमच्यात चर्चा सुरू आहे, जी आम्ही लवकरच यशस्वीपणे सोडवून घेऊ. आमच्यासाठी जागावाटपाचा कठीण पेपर आता संपला असून सोपा पेपर सोडवणे सुरू आहे. फक्त अंतिम स्वाक्षरी म्हणजेच ‘टिकमार्क’ करणे बाकी आहे.”
“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्यासोबत राष्ट्रीय आणि राज्याच्या विविध विकासकामांवर चर्चा होत असते. या दौऱ्यात साखर उद्योगासंदर्भातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आम्ही दिल्लीत आलो होतो. विधानपरिषदेत इतक्या आधी गोष्टी कधीच फायनल होत नसतात, त्या वेळेवरच होतात. त्यामुळे जागावाटपाचा अंतिम निर्णय आणि उमेदवारांची नावे थेट मुंबईतच ठरवली जातील आणि उमेदवारी अर्ज भरतानाच ती जाहीर केली जातील,” असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले.
Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी






