फोटो सौजन्य - Gemini
काय म्हणते Riteish Deshmukh ची पोस्ट?
अभिनेता रितेश देशमुखने राजा शिवाजी सिनेमाच्या सिनेमेट्रोग्राफर संतोश सिवनचे कौतुक केले आहे. तसेच त्याचे आभार मानले आहे. त्यासाठी त्याने खास पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राजा शिवाजी सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे रितेश देशमुख आणि संतोष सिवनचे एकत्र फोटोज शेअर केले आहेत. तसेच त्याखाली भलामोठा कॅप्शन देत नमूद केले आहे की, “प्रिय @sivan_santosh सर, तुम्ही सुरुवातीपासून माझ्या स्वप्नावर ज्या मनापासून विश्वास ठेवला, तो माझ्यासाठी खूप मोठा आधार ठरला. हे फक्त माझं स्वप्न राहिलं नाही, तर तुम्ही ते स्वतःचं मानून जपलं. तुमच्या पाठिंब्यामुळेच मला निर्भयपणे मोठी पावलं उचलण्याचं बळ मिळालं. जेव्हा कधी मी संभ्रमात पडलो, तेव्हा तुमचं मार्गदर्शन, अनुभव आणि विलक्षण दृष्टी मला योग्य दिशा दाखवत राहिली. या प्रवासात अनेक कठीण क्षण आले, पण मी कधीच एकटा असल्याची भावना झाली नाही. कारण प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझ्यासोबत उभे होतात. तुम्ही हा प्रवास केवळ खासच नाही, तर भावनिकदृष्ट्याही खूप सुंदर बनवला. ‘राजा शिवाजी’ या आमच्या चित्रपटाला तुम्ही आत्मा दिलात. माझे गुरू, प्रेरणास्थान आणि कायम मार्ग दाखवणारा ध्रुवतारा बनल्याबद्दल तुमचे किती आभार मानू, हे शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. सर, तुमच्याबद्दल मनात अपार प्रेम, आदर आणि कृतज्ञता आहे. तुमचं ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. मनापासून प्रेम आणि कृतज्ञतेसह, रितेश”
संतोष सिवन यांनी हिंदी, तमिळ, मल्याळम आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या सिनेमॅटोग्राफीची खास शैली जगभरात प्रसिद्ध आहे. Dil Se.., Roja, Raavan आणि Asoka यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून भारत सरकारकडून पद्मश्री सन्मानही देण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट दृश्यभाषा निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.अलीकडेच त्यांनी Raja Shivaji या चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफी केली असून हा त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे.






