UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Strike Iran : दोन दिवसांत अमेरिकेचा दुसरा हल्ला; भीषण स्फोटांनी हादरले इराणचे अब्बास बंदर
जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ ते २०३० या कालावधीत एखाद्या वर्ष सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता आहे. तापमानाचा पार वर चढून २०२४ च्या उष्णतेचे विक्रम मोडीत काढेल असे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालाचे लेखक लियोन हरमैनसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या अल-नीनो या नैसर्गिक हवामान घटना येण्याची दाट शक्यता आहे.
शास्त्राज्ञांच्या मते, पृथ्वी सातत्याने आणि वेगाने अधिक उष्ण होत चालली आहे. आर्क्टिक प्रदेशांचे तापमान प्रचंड वाढले असून यामुळे जागतिक हवामान संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. यामुळे २०१५ च्या पॅरिस कराराही धोक्यात आला आहे. या करारांतर्गत औद्योगिक पूर्व काळाच्या म्हणजेच इ.स. १८५० ते १९०० च्या तुलनेने तापमान १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सध्या तापमानाने जास्त मर्यादा ओलांडली असून ९१ टक्क्याचा पारा गाठण्याची शक्यता अहवलात व्यक्त करण्यात आली आहे.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, २०२६ ते २०३० दरम्यान जागतिक सरासरी तापमान १.३ ते १.९ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल. यामागचे मुख्य कारण म्हणजे कोळसा आणि तेलाच्या अमर्याद वापारतून मानवाद्वारे उत्सर्जित होणारे वायू आहे. यामुळे हवामानात गंभीर बदल होत असल्याचे तज्ज्ञांनी वर्तवले आहे.
रिपोर्टनुसार, २०१५ नंतर आतापर्यंत ११ वर्षे सर्वाधिक उष्ण होते. आज भारतासह युरोपही उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. तसेच आर्क्टिक भागातही बर्फ वेगाने वितळत असल्याने मोठे संकट येण्याची शक्यता आहे. ही बाब मानवी जगासाठी अत्यंत गंभीर मानली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक अत्यंत मनापासून आणि महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. या ऋतूत लोकांनी सावध, दक्ष आणि एकमेकांबद्दल संवेदनशील राहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अशी आग्रहाची विनंती पंतप्रधानांनी केली आहे. प्रत्येकाने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन) पुरेसे राखले पाहिजे; घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली अवश्य बाळगली पाहिजे आणि दुपारच्या कडाक्याच्या उन्हात विनाकारण बाहेर जाणे पूर्णपणे टाळले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.






