Vaibhav Sooryavanshi T20 Records
• अवघ्या १५ वर्षांच्या वयात वैभवने क्रिकेट विश्वात मोठी छाप पाडली आहे.
• समोर कोणताही गोलंदाज असो, त्याचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे.
• क्वालिफायर १ मध्ये त्याने आक्रमक फलंदाजी करत ९७ धावा केल्या.
• एकाच सिझनमध्ये ५९ षटकार मारत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला.
• रविचंद्रन अश्विननेही त्याच्या मानसिक परिपक्वतेचे कौतुक केले.
• क्रिकेट खेळणे आणि क्रिकेट समजणे यात फरक असतो, आणि वैभवकडे या दोन्ही गोष्टी आहेत.
IPL आता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. कोण इमर्जिंग प्लेअर ठरणार, कोण ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरणार आहे, पण त्यापेक्षा चर्चा एकाच खेळाडूची होत आहे, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. १५ वर्षांत आपण काय करत होतो हा प्रश्न केला तर कोणालाही काही सांगता येणार नाही, पण हा मुलगा या वयात एवढे मोठे कारनामे करेल अशी कोणी भविष्यवाणी केली असती तर कोणी विश्वास ठेवला नसता. पण ही गोष्ट फार विश्वसनीय आहे की तो फार कमाल आहे.
क्रिकेटकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. त्याला फरक नाही पडत समोर कोण आहे, बुमरा आहे की पॅट कमिन्स, तो येतो, त्याचं काम करतो आणि निघून जातो.
क्वालिफायर १ चा सामना झाला, जेव्हा वैभवने चार्ज करायला सुरुवात केली तेव्हा असं वाटत होतं ३०० धावा पण आरामात होतील. पण ९७ धावांवर बाद झाला आणि एक रेकॉर्ड होता होता वाचला, तो म्हणजे कमी चेंडूंमध्ये शतक झळकवण्याचा मान. सर्वाधिक एकाच सिझनमध्ये जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर कित्तेक वर्ष होता, पण ५९ छक्के मारण्याचा रेकॉर्ड अवघ्या १५ वर्षांच्या मुलाने मोडला. रविचंद्रन अश्विन असंही म्हणाला, त्याच्या आई-वडिलांनी त्याला कोणाचीही दृष्ट लागू नये यासाठी जे काही करणे आवश्यक असेल, ते सर्व केले पाहिजे. १५ व्या वर्षीच इतकी मानसिक प्रगल्भता गाठण्यासाठी फार मोठं मन असावं लागतं ते या मुलाकडे नक्कीच आहे.
RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज
क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट समजणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सचिन तेंडूलकर, विराट कोहली हे उत्तम उदाहरण आहेत.महान होणे कुठल्याही क्षेत्रात सोपी गोष्ट नक्कीच नसते,त्यासाठी खेळासाठी लागणारी आवड,जुनून हे वेगळेच असते.विनोद कांबळी हे एक उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीच्या काळात तो उत्तमच खेळत होता, पण जेव्हा लक्ष्य फार कमी ठेवता तेव्हा सर्वोत्तम होता येत नाही. पण वैभव सूर्यवंशीला पाहिल्यावर त्याच्याकडे या दोन्ही गोष्टी दिसून येतात, ते म्हणजे क्रिकेटची उत्तम जाण आणि त्यासाठी लागणारी तळमळ, आत्मीयता. या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत म्हणूनच जग त्याच्याबद्दल चर्चा करायला लागला आहे.
१) कमी वयात सर्वात वेगवान १०० षटकार
२) IPL playoff मध्ये कमी चेंडूंवर अर्धशतक — १६ बॉलमध्ये ५० धावा
३) एकाच हंगामात जास्त षटकार — ख्रिस गेलचा ५९ षटकारांचा विक्रम मोडला
List A श्रेणीमध्ये लहान वयात म्हणजे केवळ १३ वर्षे २६९ दिवसांचा असताना पदार्पण. तसेच अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुवांधार, वादळी खेळी करत ५५ चेंडूत आक्रमक शतक. एवढ्या लहान वयात जर खेळाची समज असेल तर आई-वडिलांना नक्कीच अभिमान असेल. सचिन तेंडूलकर जर त्याच्या खेळीचं कौतुक करत असेल तर नक्कीच तो स्पेशल आहे.त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रार्थना करू की तो असेच भविष्यात भारतासाठी खूप सारे रेकॉर्ड करेल, त्याचबरोबर तो स्वतःची वेगळी ओळख तयार करेल.






