(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीचा सीझन ६ शेवटच्या टप्प्यात आला आहे. राखी जेव्हा पासून बिग बॉसच्या घरात आली आहे तेव्हा पासून ती काही नाही काही तरी राडा घालतच असते. ती खूप वेळा घरातील सदस्यांना उलट सुलट बोलताना आपल्याला दिसते. तसेच तिचे सदस्यांसोबत जोरदार भांडण देखील होते.
कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहेय ज्यात राखी सावंत आणि दिपाली सय्यद यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिपालीचे लग्न झाले आहे तरी तिचे राकेश सोबत अफेर असल्याचे गंभीर वक्तव्य राखीने केले आहे. आधी दिपाली आणि राकेश यांनी राखीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पण राखी काही केल्या बडबड करायची थांबत नव्हती. राखी दिपालीच्या वैयक्तिय आयुष्याबद्दल अनेक गोष्टी बोलली, त्यानंतर या वादात तन्वीने हस्तक्षेप केला.
या भांडणात तन्वीने राखीला सांगण्याचा प्रयत्न केला पण, राखी कोणाचंही एकत नव्हती. शेवटी विशाल देखील राखीवर भडकला. कोणाच्याही लग्नावर, कुटुंबावर बोलू नकोस असं विशालने राखीला सांगितले पण याचा काहीच परिणाम झाला नाही.
राखीच्या या वक्तव्यांमुळे दिपाली वैतागली. आजच्या भागात ती रडत रडत आपल्या मनातील भावना व्यक्त करेल असं प्रोमोमध्ये दिसत आहे. राखीच्या वक्तव्यावर दिपाली राखीला म्हणते, ”आंतरधर्मीय लग्न, 26 वर्षांचा संसार… ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने माझ्या लग्नाचा विषय नव्हता काढला पाहिजे होता. ती फार चुकीचं बोलली आहे. मी तिचे बाकी सगळं सहन करेल पण, ही गोष्ट नाही.”
या सगळ्या वादामुळे राकेशला देखील वाईट वाटतं. तो राखी जवळ जाऊन तिला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करतो. राकेश राखीला म्हणतो, ” राखी एखाद्याच्या चारित्र्यावर जाणं ही चुकीची गोष्ट आहे. तुला माझ्याबद्दल जराही काहीतरी आदर असेल, तर तू तिला मी सांगतो म्हणून एकदा सॉरी बोल.”आता या सगळ्या वादांनतर राखी खरंच दिपालीची माफी मागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






