(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकार लग्नबंधणात अडकल्याचे आपण पाहिले आहे. ईशा डे, नंदिता पाटकर, अपूर्वा नेमळेकर. अशा बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे. आता यांच्यापाठोपाठ झी मराठीवरील एका लोकप्रिय अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
झी मराठीच्या तुला जपणार आहे या थ्रिलर मालिकेमुळे घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. महिमाचा साखरपुडा नुकताच पार पडला असून तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
महिमा म्हात्रेच्या होणाऱ्या पतीचे नाव रोशन विचारे असून तो सुद्धा अभिनेता आहे. आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये रोशनने भूमिका साकारल्या आहेत. ‘खरंच तिचं काय चुकलं’, ‘दार उघड बये’, ‘तुझं माझं जमतंय’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये रोशन झळकला आहे.
‘Matka King’ मधील बरखा ठरतेय चर्चेचा विषय, अभिनेत्री सई ताम्हणकरने स्व:तच्या भूमिकेबद्दल केला खुलासा
महिमाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा होणारा नवरा गुडघ्यावर बसून महिमाच्या हातात अंगठी घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. महिमाने यावेळी वेस्टर्न लूक केला आहे. बेबी पिंक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच गोड दिसत आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. फोटोवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “We Are Happily Engaged” असं कॅप्शन अभिनेत्रीने साखरपुड्याच्या फोटोंना दिलं आहे.
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘तुला जपणार आहे’ मालिकेमुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली असून याआधी तिने ‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ आणि ‘दार उघड बये’ यांसारख्या मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती साकारत असलेली मीराची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. रात्री उशिरा प्रसारित होऊनही ‘तुला जपणार आहे’ मालिकेला चांगला टीआरपी मिळत आहे.






