Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट
सावली एका गरीब घरातील मुलगी असते. तिचा स्वभाव समंजस आणि प्रेमळ आहे. ती प्रत्येक संकटांचा सामना अगदी ध्येर्याने करते. त्यानंतर तीच लग्न सारंगसोबत होतं. सारंग एका श्रीमंत घरातील मुलगा असतो. सारंगच्या घरात सावळ्या रंगाला मान्यता नाही. पण तरी देखील त्याचे लग्न सावलीसोबत झाल्याने त्यांच्या घरात प्रचंड वाद निर्माण होतात. त्यानंतर हळूहळू सावली सर्वांची मनं जिंकून घेते आणि घरात आपली जागा निर्माण करते. सावली आणि सारंग दोघांमध्ये मैत्री होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. सारंग आणि सावली दोघेही एकमेकांना उत्तम साथ देत असतात. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)
मालिकेत दाखवल्याप्रमाणे, कालांतराने त्या दोघामंध्ये गैरसमज आणि वाद निर्माण होतात. त्यानंतर सावली सारंगपासून दूर जाते. त्यानंतर सावलीला जुळी मुले होतात, पण सारंगला याबद्दल काहीही माहिती नसतं. या दरम्यान राजकुमार सावलीला व तिच्या मुलांना मारण्यासाठी काही गुंड पाठवतो. सावली एकाला वाचवते पण दुसरे मूल गुंडांच्या ताब्यात जाते. सारंग रस्त्यात गुंडांच्या हातात एका लहान बाळाला बघतो आणि गुंडांबरोबर मारामारी करत बाळाचे प्राण वाचवतो. त्यानंतर तो लहान मुलीला आपल्या घरी घेऊन जातो आणि तिची काळजी घेतो. त्याला माहिती नसते की ती त्याचीच मुलगी आहे. यादरम्यान सावलीचा दुसरा मुलगा अबीर तिच्यासोबत राहत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून सारंग आणि सावली एकमेकांसमोर आले नाहीत.
झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, सावली व ओवी स्टेजवर गात आहेत. इतक्यात तिथे सारंग आणि अबीर येतात. अबीर सावलीला आई म्हणून मोठ्याने हाक करतो. तर ओवी सारंगला बाबा म्हणून हाक मारते. यावेळी सारंग आणि सावली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या समोर येतात. ते दोघे एकमेकांकडे बघतात आणि चालत येत असल्याचे प्रोमोमध्ये दाखवले आहे. मात्र त्यानंतर क्षणातच दोघांनाही भूतकाळ आठवतो. त्यांच्यामधील दुरावा, भांडण, गैरसमज सर्वकाही आठवतं. यानंतर दोघे विरुद्ध दिशांनी जायला निघतात. मात्र ओवी व अबीर त्यांना थांबवतात. मालिकेत पुढे काय घडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, मनोरंजनाचा पारा चढणार मार्च गर्जनार च्या दोन महिन्यांनंतर कमिंन सुन जबरदस्त जून. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे की, जबरदस्त प्रोमो. खुप आतुरता आहे या गोड क्षणाची. 1 नंबर मालिका. आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, अता लवकर दोघना एकत्र आणा. आम्हाला सारंग सावलीचे सुंदर रोमँटिक क्षण आणि एक आनंदी कुटुंब एकत्र पहायचे आहे.. सारंगनी सावलीच्या गाण्याला प्रोत्साहन द्यायला हवं.






