(फोटो सौजन्य: istock)
एका विशिष्ट वयानंतर आपली हाडं ठणकू लागतात. वयोमानानुसार, शरीराची हाडे, सांधे आणि कंबर दुखणे एक सामान्य गोष्ट आहे. वय वाढताच शरीराची हाडे कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे ती पुष्कळ ठणकू लागतात. बऱ्याचदा हे दुखणे असहाय्य होऊन बसते. तसेच औषधांनीही हे दुखणे काही केल्या कमी होत नाही. मुख्य म्हणजे, या वेदना फक्त वयोवृद्धांनाच नव्हे तर तरुणांनाही भेडसावत आहेत.
आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, व्यायाम न केल्याने आणि चुकीच्या आहारामुळे या वेदना जाणवत असतात. याचे मूळ कारण शरीरात पोषकतत्वांची कमतरता हे देखील असू शकते. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सुपरफुड्सचा आपल्या आहारात समावेश करून तुम्ही या वेदना दूर करू शकता. यापदार्थांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात आत कोणकोणत्या पदार्थांचा समावेश आहे.
महिलांना विवाहित पुरुष का आवडतात? धक्कादायक कारणे ऐकून हादराल
दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा
हाडे मजबूत करण्यासाठी लहानपणापासूनच आपल्याला दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हाड मजबूत करण्यासाठी तुम्ही सर्व प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकता. यात दूध, दही, ताक, आणि चीज असे पदार्थ समाविष्ट आहेत. हाड मजबूत ठेवण्यासाठी शरीरात कॅल्शियमचे असणे फार गरजेचे असते. दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहेत. नियमित यांचे सेवन हाडे मजबूत होतात आणि सांध्यांमधील घर्षण कमी होते.
पालेभाज्यांचे सेवन
पालक, मेथी, कोथिंबीर, आणि मोहरी अशा पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात आढळून येते. यांचे नियमित सेवन हाडांना पोषण देण्यास मदत करते आणि सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असे काही अँटी-ऑक्सिडंट्सही असतात, जे सांध्यांमधील सूज आणि वेदना त्वरित कमी करतात.
रक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून काढेल हा मसाला, आठवड्याभरातच दिसून येईल फरक
डाळी आणि कडधान्ये
डाळी आणि कडधान्ये हे प्रथिनांनी समृद्ध असतात. यांचे सेवन हाडांचे आणि सांध्यांचे टिश्यू मजबूत करण्यास उपयुक्त ठरते. राजमा, मसूर, हरभरा, आणि उडीद डाळ, चण्याची डाळ अशा कडधान्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. यांचे नियमित सेवन हाडांना मजबुती देतात आणि शरीरातील पेशींच्या पुनर्निर्मितीला मदत करतात.
साळीच्या धान्यांचा आहारात समावेश
साळीचे धान्य जसे की, जव, बाजरी, रागी, आणि ओट्स हे प्रथिनांनी आणि फायबरने समृद्ध असतात. त्यातही रागी म्हणजेच नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते, जे हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. साळीचे धान्य केवळ हाडे मजबूत करत नाही, तर ते पचन सुधारून सांध्यांच्या वेदना कमी करण्यासही मदत करते.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.