अवयवदान श्रेष्ठदान; मुंबईतल्या प्रसिद्ध रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम; अवयवदानाचं सांगितलं महत्त्व
मुंबई, 21 फेब्रुवारी, 2025: एक जबाबदार कॉर्पोरेट म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने विविध धर्म आणि श्रद्धा असलेल्या संस्था आणि संघटनांना एकाच व्यासपीठावर आणत अवयवदानाविषयीचा जागरूकता कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना एकत्र आणत अवयवदानाद्वारे जीवदानाचे महत्त्व अधोरेखित केले गेले. या कार्यक्रमात विविध धार्मिक आणि सामुदायिक संघटनांच्या गटांनी स्किटच्या माध्यमातून अवयवदानाची गरज आणि महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
हा स्तुत्य उपक्रम वोक्हार्ट हॉस्पिटलच्या आरोग्यसेवा आणि सामाजिक जबाबदारीकडे लक्ष वेधण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग होता. कथाकथन व समुदाय शक्तीचा वापर करत अवयवदानाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करणे, लोकांच्या चिंता दूर करणे तसेच त्यांना अवयवदानासाठी नोंदणी करण्यास प्रेरित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या सहभागामुळे, अवयवदानाबद्दलचा संदेश 50 हजाराहून अधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक हा महत्त्वपूर्ण संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात मुंबई शहर आणि मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी उत्साहाने सहभाग घेतला. ज्यात पुढील संस्था आणि मंडळाचा समावेश आहे:
* शतायू – अ गिफ्ट ऑफ लाइफ
* सारथी फाउंडेशन
.जाइंट्स वेलफेयर फाउंडेशन
* जायंट्स ग्रुप सीपी टँक ताडदेव
* लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) चे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर उपस्थित होते. तसेच, आयईसीच्या सल्लागार सुजाता अष्टेकर आणि झेडटीसीसी मुंबईच्या मुख्य समन्वयक उर्मिला महाजन यांनी स्किट सादरीकरणांचे परीक्षण केले. त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीमुळे अवयवदानाचे महत्त्व आणखी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी बोलताना, मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सेंटर प्रमुख डॉ. वीरेंद्र चौहान म्हणाले, “हा कार्यक्रम एकता आणि करुणेचे खरे प्रतिबिंब होता, अवयवदान हे धार्मिक आणि सांस्कृतिक फरकांच्या पलीकडे जाते हे सांगतो. या सादरीकरणांद्वारे, आम्ही विविध गटांना जीवदानाविषयीच्या अर्थपूर्ण संवादात सहभागी करून घेऊ शकलो.”
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील सल्लागार नेफ्रोलॉजी डॉ. चंदन चौधरी यांनीही वेळीच पावले उचलण्याचे आणि जागरूकतेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “मूत्रपिंडाचे आजार वाढत चालले आहेत आणि उशिरा निदान झाल्यामुळे अनेक रुग्णांना प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. वेळीच निदान आणि अवयवदानाच्या जीवनरक्षक क्षमतेबद्दल विविध समुदायांना शिक्षित केल्याने रुग्णांच्या परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.”
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. निखिल भसीन यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे महत्त्व समजावून दिले ते म्हणाले की, “हजारो मूत्रपिंड निकामी झालेले रुग्ण अवयवदात्यांवर अवलंबून असतात. उपलब्ध असलेले अवयव आणि मागणी यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी अशा उपक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
एचपीबीचे सल्लागार यकृत प्रत्यारोपण आणि मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील जीआय सर्जन डॉ. स्वप्नील शर्मा म्हणाले, ”यकृत प्रत्यारोपण हे एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जीवनरक्षक असू शकते, तरीही उपलब्ध असलेल्या यकृत दात्यांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना बराच काळ वाट पहावी लागते. अशा सामुदायिक सहभाग जागरूकता कार्यक्रमांद्वारे, आपण अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहित करू शकतो आणि ही परिस्थिती सुधारू शकतो.”
या उपक्रमाचे कौतुक करताना झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC). चे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर म्हणाले की, “अवयव दानाचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वांचा सहभाग आणि जागरूकता महत्त्वाची आहे. अशा कार्यक्रमांमुळे लोकांना अवयवदानाचे महत्त्व कळते, तसेच गैरसमज दूर होतात जे अनेकदा लोकांना जीव वाचवू शकणारे हे पाऊल उचलण्यापासून रोखतात.”
या कार्यक्रमाला आरोग्यसेवा व्यावसायिक, विविध संघटनांचे नेते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते जे या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आले होते. स्किटच्या माध्यमातून अवयवदानाची गरज प्रभावीपणे मांडली, गैरसमजांना खोडून काढले.मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल महत्त्वाच्या आरोग्यसेवा समस्यांबद्दल जागरूकता आणि चर्चा करण्यास वचनबद्ध आहे. रुग्णालय अशा उपक्रमांना पुढेही सुरू ठेवेल जे अवदानासाठी विविध संघटनांना कायम प्रोत्साहन देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.