(फोटो सौजन्य – Pinterest)
नॉनव्हेज लव्हर्ससाठी चिकन म्हणजे स्वर्गसुखच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चिकन खायला फार आवडते. बहुतेक लोक चिकन बनवताना प्रथम चिकनला पाण्याने स्वछ धुतात. नुकताच यासंबंधित एक धक्कादायक संशोधन सामोरे आले आहे. संशोधनात अनेक खुलासे करण्यात आले आहेत जे तुम्हाला थक्क करू शकतात. स्वच्छतेच्या करणारे आपण चिकनला शिवण्यापूर्वी नेहमी धुवत असतो मात्र काय होईल जर आम्ही तुम्हाला सांगितले की, असे करणे योग्य नाही. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण तुम्हालाही जर चिकन धुण्याची सवय असेल तर ही सवय ताबडतोब थांबवा. अन्यथा या सवयीचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Muramba Recipe: कच्च्या कैरीपासून घरी बनवा आंबट गोड मुरांबा; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी
द कॉन्व्हर्सेशनच्या एका अहवालानुसार, जगभरातील अन्न सुरक्षा अधिकारी चिकन शिजवण्यापूर्वी त्याला न धुण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे चिकन धुण्यामुळे स्वयंपाकघरात धोकादायक बॅक्टेरिया पसरू शकतात. चिकन न धुता ते पूर्णपणे शिजवणे चांगले, म्हणून ते खाण्याचा हा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो. पण प्रश्न असा आहे की किती लोकांना याबद्दल माहिती आहे? नवीन अभ्यासात काही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे जी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी ‘थ्री ड्रिंक थिअरी’चा सोपा फॉर्म्युला; जाणून घ्या
चिकन धुणे ही एक सामान्य पद्धत आहे. ऑस्ट्रेलियाच्या अन्न सुरक्षा माहिती परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की जवळजवळ अर्धे ऑस्ट्रेलियन कुटुंबे स्वयंपाक करण्यापूर्वी चिकन धुतात. डच संशोधनात असे आढळून आले की २५% ग्राहक त्यांचे चिकन वारंवार किंवा जवळजवळ नेहमीच धुतात. मग लोक असे का करतात आणि चिकन धुण्याच्या धोक्यांबद्दल संशोधन काय म्हणते? अन्नासंबंधित आजाराची दोन मुख्य कारणे म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर (Campylobacter ) आणि साल्मोनेला (Salmonella) हे बॅक्टेरिया, जे सामान्यतः चिकनमध्ये आढळून येतात. कच्चे चिकन धुतले की ते स्वयंपाकघरात त्यातील जिवाणू पसरतात, ज्यामुळे आजारांचा धोका वाढतो. संशोधनात हे आढळून आले आहे की, पाण्याचा शिडकाव हा चिकनवरील जिवाणूंची संख्या आणखीन वाढवते ज्यामुळे आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण होतो.
साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. यामुळे आपला जीव देखील जाऊ शकतो. तथापि, स्वयंपाक करण्यापूर्वी चिकन धुण्याने चिकनमधील सर्व जंतू नष्ट होत नाहीत. ते फक्त पृष्ठभागावरील बॅक्टेरिया काढून टाकते. या प्रक्रियेमुळे कच्च्या चिकनमधून संसर्ग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो कारण त्यामुळे चिकनच्या त्वचेपासून स्वच्छ केलेले बॅक्टेरिया स्वयंपाकघरात फिरू शकतात.