अनेक नेतेमंडळी करताहेत भाजपमध्ये प्रवेश तर भाजपचेच विद्यमान खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसला आहे. खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिसारचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली.

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का बसला आहे. खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिसारचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली.

    राजकीय कारणामुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले. ‘मला हिसारचे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे तसेच पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांचे आभार मानू इच्छितो’, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

    ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात अटकळांना सुरुवात झाली आहे. ब्रिजेंद्र सिंह यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.