
यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धामधूम सुरू असतानाच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Election) राजकीय पक्षांमध्ये गदारोळ सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे.
नवी दिल्ली : यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) धामधूम सुरू असतानाच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत (Loksabha Election) राजकीय पक्षांमध्ये गदारोळ सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे.
पाच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्र्यांच्या कामाचा तपशील मागवला आहे. सरकारच्या वतीने, मंत्र्यांना जनतेशी संबंधित त्यांच्या मंत्रालयांच्या योजना आणि उपलब्धींची संपूर्ण माहिती पाठविण्यास सांगितले आहे.
कोणत्या योजनेतून किती नफा झाला?
केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्र्यांना गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मंत्रालयाच्या प्रत्येक योजनेतून जनतेला किती फायदा झाला याचा तपशील पाठवण्यास सांगितले आहे. मंत्रालयाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाभ घेतलेल्या लोकांच्या संख्येची आकडेवारीही सादर करावी, असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत.