श्रीराम मंदिर देणगीप्रकरणी काँग्रेसचा सत्याग्रह; निष्पक्ष चौकशीची मागणी
कराड : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सातारा शहरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सातारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हनुमान मंदिर परिसरात जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्या सुनंदामाई पाटील, पंचायत समिती सदस्य रवी बडेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमाराजे घोरपडे, प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, रफिकभाई, अन्वरभाई, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, एससी विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, मनोजकुमार तपासे, कराड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी नामदेवराव पाटील यांनी, श्रीराम मंदिरासाठी देशभरातील भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या रोख रक्कम, सोने-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांकडे लक्ष वेधले. या प्रकरणाची कोणताही पक्षपात न करता सखोल व पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. हा विषय केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नसून कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी निगडित असल्याने सत्य जनतेसमोर येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सातारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, तसेच संपूर्ण तपास पारदर्शक पद्धतीने करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
रामटेक राम मंदिराचे ‘श्री राम मंदिर देवस्थान’ म्हणून पुनर्गठन
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक आणि प्राचीन भोसला देवस्थानचे प्रशासन अधिक सुयोग्य, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठीचे विशेष विधेयक विधानसभेत विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जैसवाल यांनी मांडले. या विधेयकावर सभागृहात प्रदीर्घ आगि सविस्तर चर्चा झाल्यानंतर अखेर या महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या देखरेखीकडून शासकीय नियंत्रणाकडे रामटेक येथील हे मंदिर श्री रामांचे एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर असून, त्याला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे.
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचे थैमान; भूस्खलन, पूरामुळे जनजीवन विस्कळीत, IMD कडून अलर्ट जारी






