Delhi MCD Bypoll Results 2025: दिल्ली पोटनिवडणुकीत १२ प्रभागांचे निकाल जाहीर; भाजपने मारली बाजी, वाचा कोणाला मिळाल्या किती जागा
दिल्लीत भाजप सरकार स्थापन झाल्यानंतरच्या या पहिल्या निवडणुकीत पक्षाने दोन जागा गमावल्या होत्या. पण दिल्ली पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसने आपले खाते उघडण्यात यश मिळवले आहे. भाजपने (BJP) द्वारका-बी, अशोक विहार, ग्रेटर कैलाश, दिचौन कलान, शालीमार बाग-बी, विनोद नगर आणि चांदणी चौक या प्रभागात विजय मिळवला.
आम आदमी पक्षाला नारायणा, मुंडका, दक्षिणपुरी या तीन जागांवर विजय मिळवला तर इतर पक्षाला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसचे (Congress) सुरेश चौधरी यांनी संगम विहार-ए येथे ३,६२८ मतांनी विजय मिळवला. हा काँग्रेसचा एकमेव विजय होता. चांदणी महलमध्ये एआयएफबीचे मोहम्मद इम्रान यांचा विजय झाला. या १२प्रभागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ३८.५१% होती, जी २०२२ च्या २५० वॉर्डांच्या निवडणुकीत ५०.४७% मतदानापेक्षा खूपच कमी आहे.
दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) १२ वॉर्डांमधील पोटनिवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान झाले. ५१ उमेदवार रिंगणात होते. यावेळी मतदानाचे प्रमाण ३८.५१% होते.
या १२ जागांपैकी ११ जागा नगरसेवक आमदार झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. २०२४ मध्ये माजी नगरसेवक कमलजीत सेहरावत यांनी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली तेव्हा द्वारका ब जागा रिक्त झाली होती.
भाजपने या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. ७० पैकी ४८ जागा जिंकून २६ वर्षांनी सत्तेत परतला. तर आम आदमी पक्षाने ( AAP) २२ जागांवर विजय मिळाल.
यंदाच्या दिल्ली विधासभा निवडणुकीत, भाजपने ६८ जागा लढवल्या आणि ४८ जागा जिंकल्या. याचा अर्थ त्यांच्या मतांमध्ये ४० जागांची वाढ झाली आणि त्यांचा स्ट्राइक रेट ७१% होता. दुसरीकडे, आपने ४० जागा गमावल्या.
भाजपला आप पेक्षा ३.६% जास्त मते मिळाली आणि २६ जागा जास्त जिंकल्या. दरम्यान, सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीत एकही जागा जिंकू शकली नाही.
मागील निवडणुकीच्या (२०२०) तुलनेत, भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ९% पेक्षा जास्त वाढ झाली. आप’ला जवळपास १०% ने नुकसान सहन करावे लागले. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी, त्यांना त्यांच्या मतांच्या टक्केवारीत २% वाढ करण्यात यश आले.
दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. भाजपचे उमेदवार राजा इक्बाल सिंग १३३ मते मिळवून विजयी झाले. राजा इक्बाल एमसीडीमध्ये विरोधी पक्षनेते होते आणि यापूर्वी त्यांनी उत्तर एमसीडीचे महापौर म्हणून काम पाहिले होते.






