गुवाहाटी : देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Increase in Crime) सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात आसाममध्ये (Assam Crime) धक्कादायक घटना घडली. गुवाहाटीच्या डॉक्टर दाम्पत्याने दत्तक मुलीच्या प्रायव्हेट पार्टला सिगारेटने चटके दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. वलीउल इस्लाम याच्यासह त्याची पत्नी डॉ. संगीता दत्ता या दोघांना अटक केली आहे.
गुवाहाटी येथील मनोचिकित्सक डॉ. वलीउल इस्लाम आणि त्याच्या पत्नीविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डॉक्टर दाम्पत्याने पीडित 3 वर्षांच्या मुलीला अपार्टमेंटच्या गच्चीवर बांधून ठेवल्याचा आरोप आहे. या मुलीची सतत छेड काढत असल्याचा आरोप आहे. यामध्ये त्यांनी मुलीचे हात बांधून तिला टेरेसवर उन्हात उभेही केले होते. याप्रकरणी डॉक्टर दाम्पत्याच्या शेजाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत कारवाई केली.
अल्पवयीन मुलीच्या अंगावर जखमा
डॉक्टर दाम्पत्याने अल्पवयीन मुलीला राहत्या घरातच चौथ्या मजल्यावर बंद करून ठेवलं होतं. या मुलीच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टला सिगारेटने चटके दिल्याचे समोर आलं आहे.
मोलकरीण अटकेत
हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. तसेच त्यांच्या मोलकरणीलाही अटक करण्यात आली. न्यायालयाने या दाम्पत्याला 5 दिवसांची तर मोलकरणीला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.