गुगलची मोठी कारवाई; फेक लोन ऍप्स गुगल प्ले स्टोअरवरून हटवले

आजकाल काही मिनिटांमध्येच लोन उपलब्ध करुन देणारे कित्येक अॅप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. यांपैकी बरेच ऍप्स तर जास्त डॉक्युमेंट्सही मागत नाहीत. त्यामुळे लोक गरजेच्या वेळी अशा ऍप्सची मदत घेतात.

    नवी दिल्ली : आजकाल काही मिनिटांमध्येच लोन उपलब्ध करुन देणारे कित्येक अॅप्स प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. यांपैकी बरेच ऍप्स तर जास्त डॉक्युमेंट्सही मागत नाहीत. त्यामुळे लोक गरजेच्या वेळी अशा ऍप्सची मदत घेतात. मात्र, यांपैकी बऱ्याच ऍप्सचे कर्मचारी त्यानंतर ग्राहकांना मानसिक त्रास, धमक्या द्यायला सुरू करतात.

    काही प्रकरणांमध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक देखील होते. अशाच फेक लोन अॅप्सवर गुगलने मोठी कारवाई केली आहे. यूजर्सच्या सुरक्षिततेसाठी गुगलने प्ले स्टोअरवर असणारे तब्बल 2,200 फेक लोन अॅप्स डिलीट केले आहेत. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने एप्रिल 2021 ते जुलै 2022 या कालावधीत 3,500 ते 4,000 लोन अॅप्सची पडताळणी केली. यानंतर सुमारे 2,500 अॅप्स डिलीट केले.

    यानंतर सप्टेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये देखील गुगलने असेच 2,200 अॅप्स प्लेस्टोअरवरुन हटवले आहेत. गुगलने अशा अॅप्ससाठी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. आता केवळ रजिस्टर्ड संस्था किंवा रजिस्टर्ड संस्थांसोबत काम करणाऱ्या अॅप्सनाच प्ले स्टोअरवर स्थान देण्यात येत आहे.