आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरचे तिकीट बुक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सीमा खरोखरच पाकिस्तानात परतणार का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ही तिकिटे समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अभिषेक सोम यांनी तिकिटाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यासोबतच त्यानी सीमा आणि सचिनच्या कथेवर बनणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.
तिकीटाचा फोटो आणि चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिषेकने लिहिले की, ‘#SeemaHaider देशाच्या गद्दारांना भारतात राहायला जागा मिळणार नाही, तुमच्या हिरोईनला घेऊन पाकिस्तानात जा. अमित जानी यांना देशात हिंदू-मुस्लिम दंगल घडवायची आहे.
गुलाम हैदर यांना निमंत्रण पाठवले
दिग्दर्शक-निर्माते अमित जानी सीमाच्या कथेवर चित्रपट बनवत असल्याचे वृत्त आहे. सीमा यांचे पहिले पती गुलाम हैदर यांनाही त्यांनी भारतभेटीचे आमंत्रण पाठवले आहे. या चित्रपटाचे नाव ‘कराची ते नोएडा’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी त्यानी ऑडिशन्सही घेतल्या आहेत. त्यांनी सीमाचे पती गुलाम हैदर याला दिल्ली किंवा मुंबईला येण्यास सांगितले आहे.
चित्रपटासाठी सीमाचे माजी पती गुलाम हैदर यांच्याशी बोलू इच्छित असल्याचे सांगत अमित जानी यांनी व्हिडिओ जारी केला. त्यांना सीमाबाबत अधिकाधिक माहिती गोळा करायची आहे. गुलाम यांना सांगण्यात आले आहे की ते भारतात येऊ शकत नसतील तर त्यांचे लेखक सौदी अरेबियाला जाऊ शकतात. त्यांचे मत घेऊ शकतात. गुलाम सीमाशी संबंधित माहिती देऊ शकतात, जी चित्रपटासाठी महत्त्वाची ठरू शकते.
अमित जानी म्हणतात की, देशातील आणि जगातील लोकांना सचिन आणि सीमाची कहाणी जाणून घ्यायची आहे. यासाठी 50-60 मॉडेल्सच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.