(फोटो सौजन्य: Pinterest)
ग्राहकांनी ‘स्विगी इंस्टामार्ट’ला द्वारे मुदत संपलेले, खराब झालेले, दूषित आणि इतर प्रकारे असुरक्षित खाद्यपदार्थ पुरवले जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या, असे नियामकाने नमूद केले. एफएसएसएआने या प्लॅटफॉर्मला सविस्तर स्पष्टीकरण आणि नियमांचे पालन केल्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. असे न केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘स्विगी इंस्टामार्ट’ ला हा ऑनलाइन अन्न वितरण कंपनी ‘स्विगी’ चा ‘विवक-कॉमर्स’ विभाग आहे.
तक्रारींचा तपशील देताना एफएसएसएआयने म्हटले आहे की, लहान मुलांच्या एका खाद्यपदार्थाबाबत तक्रार प्राप्त झाली होती, जो अत्यंत खराब आणि असुरक्षित स्थितीत असल्याचे आढळले. त्यात दूषितपणा तसेच अयोग्य साठवणूक आणि हाताळणीची चिन्हे दिसून आली. तो पदार्थ परत केल्यानंतरही, तो कथितरीत्या पुन्हा ग्राहकाला पाठवण्यात आला. ‘स्विगी इंस्टामार्ट’ द्वारे खराब झालेली अंडी आणि दूध, तसेच खराब झालेले पॅकबंद खाद्यपदार्थ पुरवले गेल्याचा आरोपही तक्रारींमध्ये करण्यात आला होता.
राष्ट्रहित सर्वोपरी! AFMC चा दिमाखदार सोहळा; १४१ वैद्यकीय अधिकारी सशस्त्र दलात दाखल
असमाधानकारक प्रतिसाद
एफएसएसएआयच्या मते, तपासादरम्यान असेही आढळून आले की काही प्रकरणामध्ये एफएसएसएआय परवाना क्रमांक चुकीचे, अवैध किंवा अस्तित्वात नसलेले होते. शिवाय, अन्न व्यवसाय हे त्यांच्या एफएसएसएआय नोंदणीमध्ये नमूद केलेल्या नावांपेक्षा वेगळ्या नावांनी सूचीबद्ध केले गेल्याचेही समोर आले. नियामकाने म्हटले आहे की, काही तक्रारींमध्ये असा आरोप करण्यात आला की, प्रकरण वरिष्ठ स्तरावर नेऊनही त्यावर समाधानकारक प्रतिसाद, तक्रार निवारण किवा सुधारणात्मक कारवाई झाली नाही. दरम्यान, एका तक्रारीत असे नमूद केले की, अन्न सुरक्षेच्या मुद्द्यांकडे लक्ष न देता केवळ पैशांचा परतावा देण्याची ऑफर देण्यात आली. एफएसएसएआयच्या मते, या नोटीसामुळे विक्रेत्यांची नोंदणी, नियमांच्या पालनाची पडताळणी, अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण आणि अन्न सुरक्षा प्रणालींची पर्याप्तता यांबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






