आपण आता 21 व्या शतकात आहोत. जुन्या रुढी परंपरा चालीरितीला फाटा देत आज स्त्री पुरुष समानतेने समाजात वावरत आहेत. पण आजही भारतातील काही गावात जुन्या परंपरा आणि रीतिरीवाज पाळल्या जातात. त्या गावातील एक अजब परंपरा ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्या गावातील महिला 5 दिवस कपडे घालत नाहीत. हो बरोबर असं एक गाव आपल्या भारतात आहे. या महिला असं का करता यामागचं कारण ऐकून तुम्ही नक्की अवाक् व्हाल. आजही ही परंपरा या गावातील महिला पाळतात.
हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील आहे. झी न्यूज रिपोर्ट्सनुसार, इथल्या पिनी गावात दरवर्षी इथल्या महिला सावन महिन्यात पाच दिवस कपडे घालत नाहीत. जर एखाद्या महिलेनं असं केलं नाही तर तिला काही दिवसांतच वाईट बातमी ऐकायला मिळते. एवढंच नाही तर या काळात संपूर्ण गावात कोणीही पती-पत्नी एकमेकांशी बोलत नाहीत आणि एकमेकांपासून पूर्णपणे दूर राहतात.
या पाच दिवसांमध्ये पुरुषांसाठीही काही नियम बनवण्यात आले आहेत. या काळात पुरुष दारू आणि मांसाचे सेवन करणार नाहीत. असं मानलं जातं की जर कोणी ही परंपरा नीट पाळली नाही तर देवता क्रोधित होऊन त्याचं नुकसान करतात. या परंपरेमागे एक कथा आहे, ज्यामुळे हे सर्व घडत आहे. फार पूर्वीपासून राक्षसांची दहशत होती यानंतर ‘लहुआ घोंड’ नावाची देवता पिनी गावात आली आणि त्याने राक्षसाचा वध करून गावाचे रक्षण केले. ही सर्व राक्षसी सुंदर सुंदर वस्त्रे परिधान केलेल्या गावातील विवाहित स्त्रियांना पळवून नेत असत. देवतांनी असुरांचा वध करून स्त्रियांना यापासून वाचवले. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वीही अशा अनेक विचित्र परंपरा समोर आल्या आहेत. जगातील अनेक कानाकोपऱ्यात अशा वेगवेगळ्या, विचित्र परंपरा मानल्या जातात. आपण विचारही करु शकत नाही अशा परंपरा लोक वर्षानुवर्षे पाळत आले आहेत.